ताज्या घडामोडी

ओगलेवाडी ता.कराड येथील 19 वर्षीय तरुण नागाला पकडून त्याच्याबरोबर व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा नोंद ..

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : शुक्रवारी ओगलेवाडी,ता.कराड नजीक राहणाऱ्या ओमकार रामचंद्र साळुंखे वय वर्षे 19 याने नागाला पकडून त्याचे बरोबर व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्राम या सोशल साइटवर अपलोड केल्याबद्दल वनखात्याला समजले. या समजलेल्या माहितीवरून सत्यता पडताळणी करणे कामी शुक्रवार दिनांक 24 रोजी ओंकार रामचंद्र साळुंखे या युवकाने सोशल मीडियावरील इंस्टाग्राम ॲपवर नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून अपलोड केला होता. त्या अनुषंगाने सदर युवकाचा तपास केला हा युवक ओगलेवाडी येथील आत्माराम विद्यालय ओगलेवाडीच्या नजीक राहत असल्याचे समजले. सदर इसमास युवकास ओगलेवाडी येथील आत्माराम विद्यालय ओगलेवाडी च्या नजीक जाऊन चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर युवकावर वनखात्यामार्फत वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. वन्य प्राण्या सोबत व्हिडिओ तयार करणे व सोशल मीडियावर प्रसार करणे, प्रकट केलेबद्दल युवकावर वनक्षेत्रपाल कराड यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते सातारा, तुषार नवले वनक्षेत्रपाल कराड, बाबुराव कदम वनपाल मलकापूर यांनी केला आहे. रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक यांचे सदर गुन्हे कमी तपासात सहकार्य लाभले, व वनकर्मचारी वन रक्षक रमेश जाधव, सचिन खंडागळे भारत खटावकर यांनी या तपासामध्ये सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!