ताज्या घडामोडी

स्व भीमराव पाटील आण्णा यांच्या पुण्यतिथी निमित्त व जागतिक महिला दिन

Spread the love

स्व. भीमराव पाटील आण्णा यांच्या पुण्यतिथी निमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त, सावित्री महिला मंडळ कामेरी यांनी भरवलेल्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यांना महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन कामेरी गावचे प्रथम नागरिक सौ स्वप्नाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

रचना पाटील शृतिका माळी वेदिका पाटील प्राजक्ता कुंभार रागिनी मोहिते मोहिनी जाधव नेहा पवार जोशना माने राधिका कापसे वैष्णवी पाटील सुजाता पाटील वैशाली पाटील उज्वला धाबळी प्रगती डंबे शैलेजा राजमाने राजश्री बाबर स्मिता पाटील या सर्व महिलांना पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जगात भारी नऊवारी (रॅम्पवॉक स्पर्धा) महिला गट व मुलींचा गट स्पर्धांमधून एकूण 20 बक्षिसे प्रदान करण्यात आली. कामेरी पंचक्रोशीतील सर्व महिला व तरुण भगिनींनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. सखी महिला ग्रुप, कराड यांचा सांस्कृतिक कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हळदी कुंकू समारंभ लकी ड्रॉ समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

सावित्री महिला मंडळाच्या सचिव सौ छाया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खास महिलांच्या आग्रहास्तव भैरवनाथ मंदिर येथे मराठी चित्रपट झिम्मा पडद्यावरती दाखवण्यात आला. सावित्री महिला मंडळातील वर्षा चौगुले स्वप्नाली पाटील सुजाता चव्हाण धनश्री चौगुले दीपाली जाधव माधवी जाधव स्वप्ना चौगुले प्रियांका दाभोळे मयुरी चौगुले नीलम जाधव अलका पाटील आरती बनगे भारती पाटील बिस्मिल्ला मुगदुम इत्यादी सदस्यांनी सौ स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सर्व नियोजन पार पाडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!