ताज्या घडामोडी

रासायनिक खतखर्च बचत तंत्रज्ञान आत्मसात करा डॉ ढगे

Spread the love

नेवासा तालुक्यातील गोगलगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत कृषी सप्ताह मोहीम साजरी करण्यात आली याप्रसंगी बोलताना कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक राव ढगे म्हणाले की रासायनिक खताच्या खर्चामध्ये बचत करणे काळाची गरज आहे त्यासाठी शेतकरी बंधूआधुनिक पद्धती आत्मसात कराव्यात सेंद्रिय खते रासायनिक खते व जिवाणू खते यांचा एकत्रित वापर करावा बहुतांशी शेतकरी जिवाणू खते वापरत नाहीत जिवाणू खते स्वस्त हाताळण्यास सोपे तसेच रासायनिक खतांच्या विघटनासाठी व उपलब्धतेसाठी उपयुक्त आहेतरासायनिक खते वापरताना कार्यक्षमपणे वापरण्यासाठी तंत्र व मंत्र उपलब्ध आहेतउदाहरणार्थ युरिया वापरताना नीम कॉटेड सल्फर कॉटेड व सुपर ग्रॅन्युल्स वापरावेत त्यामुळे हवेमध्ये व पाण्यावाटे होणारा ऱ्हासकमी होतो नत्रयुक्त खते एकाच वेळी न देता विभागून द्यावीस्फुरद व पालाश ही खते पेरणीच्या वेळी द्यावीरासायनिक खते फेकून देऊ नयेत माती होण्यासाठी नियोजन करावे यासारखे अनेक उपाय सविस्तरपणे त्यांनी सांगितलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजीसंचालक अनिलराव मते होते
कृषी पर्यवेक्षक लक्ष्मणराव सुडके यांनी कृषी संजीवनी मोहिमेचा उद्दिष्ट विस्तृत करून आता सोयाबीनची लागवड करावी असे आवाहन केले सोयाब पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी फुले किमया नवीन जातीचा वापर करावा एकरी एक गोणीडीएपी द्यावी सुडके यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले याप्रसंगी अमोल मते व कृषी मित्र मच्छिंद्र मते लक्ष्मीकांत मते सिताराम मते विष्णू मते काकासाहेब पाटील विश्वनाथ पाटील कल्याणराव मते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती कीर्ती सूर्यवंशी यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!