ताज्या घडामोडी

सांगोला मध्ये २३व२४जुलैला आदिवासीं धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन.

Spread the love

भारत कवितके मुंबई.
आदिवासीं धनगर समाजाचे चौथे साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक २३ व २४ जुलै २०२२रोजी सांगोला येथे करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आर.एस.चोपडे यांनी कुपवाड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणीं पत्रकार परिषदेत जाहीर केले.या दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उदघाटन,परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलन, चर्चासत्र,व्याख्याने,आदि भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्रामधील धनगर समाज बांधवानी या संमेलनाचा लाभ घ्यावा.सोलापूर येथे २०१७ साली पहिले आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,लातूर येथे २०१८ दुसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,तर म्हसवड येथे २०१९ साली तिसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.चौथे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छानुसार सन२०२० मध्ये जाहिर केले होते,परंतु कोरोना प्रादुर्भाव काळामुळे रद्द करण्यात आले होते. ते आता माजी आमदार गणपतराव देशमुख स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन सांगोला येथे करण्यात येत आहे.असे अध्यक्ष आर एस चोपडे यांनीं बैठकीत सांगितले. या बैठकीत साहित्य संमेलनाचे संस्थापक अभिमन्यू टकले,कार्याध्यक्ष विष्णु देशमुख,कुंडलिक आलदर,संजय शिंगाडे,माजी महापौर संगीता खोत,नगरसेवक विष्णु माने,उद्योजक पांडुरंग रुपनर व इतर मान्यवर उपस्थित होते..
भारत कवितके मुंबई मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!