आरोग्य व शिक्षण

मुंबई – पुणे – हैदराबाद धावणार हाय स्पीड ट्रेन ; लोणावळ्यातून लवकरच सर्वेक्षण होणार !

Spread the love

तळेगाव : प्रवाशांची सोय रेल्वे नेहमीच बघत असते. त्यांचा विचार अग्रभागी ठेऊनच रेल्वे अधिक जलद करण्याच्या दृष्टीने सध्या अनेक पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई – पुणे –  हैदराबाद या हायस्पीड रेल्वे कोरिडोर साठी सर्वेक्षण पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात पीएमआर डी ए च्या विकास आराखड्यात होणार आहे .

भारतीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने रेल्वे अधिक गतिमान करण्यासाठी 8 ठिकाणी हा कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे . या ट्रेन्स चा वेग ताशी 250 ते 300 किलोमीटर करण्यात  येणार आहे , हैदराबाद ते मुंबई  हे  711 किलोमीटर चे अंतर अवघ्या साडे तीन तासात कापण्याचा मानस आहे .या ट्रेनच्या मार्गावर मोजकेच थांबे असतील. ज्यात लोणावळा,पुणे ,सोलापूर , पंढरपूर असे मोजकेच थांबे असतील.

विकास आराखड्यात ग्रोथ सेंटर ही प्रस्तावित करण्यात आले आहे . या आधी हा मार्ग पी एम आर डी ए च्या विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेला नव्हता. तो व्हावा यासाठी हाय स्पीड कार्पोरेशन ने पत्राद्वारे पाठपुरावा करून समाविष्ट करवून घेतला आहे. त्यासाठी नुकतेच कंपनीच्या अधिका-यांनी पीएम आर डी ए च्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा ही केली होती.त्यानुसार हा मार्ग आणि हा प्रकल्प निश्चित करण्यात आला .आपल्या पुणे जिल्ह्यातील समस्त प्रवाशांसाठी ही ट्रेन म्हणजे विकासाचा सुवर्ण काळच घेऊन येणार आहे यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!