ताज्या घडामोडी

राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श तरुणांनी जोपासला पाहिजे……कमलाकर मोटे

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २६ (प्रतिनिधी) : शाहू महाराजांनी प्रतिकुल काळात आपल्या मागास, पिडीत, वंचीत लोकांसाठी शिक्षण अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे ओळखले होते. समाजाच्या सर्वांगीण विकासाचे साधन म्हणजे शिक्षण असे प्रतिपादन कंटेकूरच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर मोटे यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२६) रोजी आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले होते. पुढे बोलताना मोटे म्हणाले की, पीडित वंचितांना सामाजिक न्याय मिळावा ही मुळ संकल्पना व प्रेरणा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची होती. शाहू महाराजांच्या विचारांचा लेखाजोखा मांडतांना त्यांनी त्यावेळच्या घटनाक्रम सांगून जीवनपट मांडला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी शाहू महाराजांच्या जयंतीचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रमेश आडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. राजकुमार रोहीकर यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. गोपाळ कुलकर्णी तर आभार डॉ. सुशील मठपती यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!