आरोग्य व शिक्षण

तळेगावमधील भोई आळीतील दुर्गामाता मंदिरात घटस्थापना उत्साहात संपन्न

Spread the love

तळेगाव : आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौउत्सवानिमित्त तळेगावातील भोई आळीमधील दुर्गामाता मंदिरात  घटस्थापना करण्यात आली.

अतिशय भक्तिमय वातावरणात सकाळी 11 वाजता गुरुजी विजय मायदेव यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीची घटस्थापना करण्यात आली.

नवरात्र उत्सवानिमित्त देवीला साडी नेसवून व अलंकार घालून सजवण्यात आले. सर्व अस्त्र परिधान केलेल्या देवीचे रूप त्यामुळे आणखीनच खुलले होते. सिंहावर विराजमान झालेल्या दुर्गामातेकडे सर्व भाविकांनी  कोरोना लवकरात लवकर जाऊ दे, असे साकडे घालून देवीची मनोभावे पूजा केली.

यावेळी गोपाळ परदेशी, महादेव परदेशी, प्रमोद परदेशी, संतोष परदेशी, काळुराम परदेशी, प्रेमनाथ परदेशी, वर्षा परदेशी, वैशाली परदेशी, संजीवनी परदेशी, नंदिता परदेशी, गीता परदेशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!