आपला जिल्हा

‘महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीला गती द्या’ या थीम अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन, व पुरस्कार सोहळा – 2024 साजरा

आत्मिक बळ महिला सबलीकरणामध्ये महत्त्वाचे आहे- ममता सिंधुताई सपकाळ

Spread the love

प्रतिनिधी श्रावणी कामत

पुणे: महिलांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी त्यांचं आत्मिकबळ वाढवणं गरजेचं असतं. समाज म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी असते. कुटूंबाचा आधार असेल तर महिला जग पादाक्रांत करु शकतात, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सहजगत्या दिसून येतील, असं प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या ममता सकपाळ यांनी केले.

महिला दिनाच्या निमित्ताने डिव्हाईन एचआर फोरम व एस.बी.पाटील मॅनेजमेंट तर्फे समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 21 महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सपकाळ म्हणाल्या,’ सिंधुताईंनी समजातील उपेक्षित घटकांसाठी भिक्षा मागत आपला विस्तारीत प्रपंच वाढवला. निराधारांची आई बनली आणि समाजाला सकारात्मकतेचे धडे दिले.’कार्यक्रमाला यावेळी ममता सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ. मृणालिनी वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. वाणी म्हणाल्या, ” माझं राजकीय क्षेत्रातील पदार्पण हे कौटुंबिक पार्श्वभूमी सुशिक्षित, प्रगल्भ विचारसरणीची असतील तर राजकारणाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित लोकांचे प्रश्न सोडवणे महिलांना सहज शक्य होतं याचं द्योतक आहे. महिलांनी आपला विकास केला तर समाज प्रगतीपथावर जाईल ‘

या कार्यक्रमाचे आयोजन प्रीती साखरे,कीर्ती धारवाडकर यांनी केले सुत्रसंचालन सीमंतीनी पुराणकर,आणि वहिदा पठाण यांनी केले तर प्रास्ताविक शीतल इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराज बुंदेल, रोहित कळमकर, सावित्री गोसलवाद क्षितीज शिंपी, किशोर केंचे, उदय निकम .यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!