मावळ

ओवळे गावात 2 कोटी 59 लाख रू. निधीतून विविध विकासकामांचे उदघाटन संपन्न.

विकासकामांचे उदघाटन संपन्न. शिवभक्त-अजित शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मानले सर्वाचे आभार.

Spread the love

ओवळे– ओवळे गावात 2 कोटी 59 लाख रूपयांच्या निधीतून रस्ते,वीज,पाणी तसेच इतर विविध विकासकामांचा भव्य उदघाटन समारंभ संपन्न झाला.

यावेळी गावच्या विकासासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार-मा.श्री.सुनिलअण्णा शेळके,संसदरत्न खासदार-मा.श्री.श्रीरंगआप्पा बारणे,मा.राज्यमंत्री-मा.श्री.बाळाभाऊ भेगडे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे.तसेच ह्यावेळी गावच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल मावळचे आमदार-सुनिलअण्णा शेळके,खासदार-श्रीरंगआप्पा बारणे तसेच मा.राज्यमंत्री -बाळाभाऊ भेगडे यांनी निधी दिल्याबद्दल तसेच ओवळे ग्रामपंचायत चे सरपंच-श्री.दिलिपनाना शिंदे,उपसरपंच-सौ.भाग्यश्रीताई अविनाश साठे तसेच इतर सर्व ग्रा.सदस्य यांनी गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून निधी आणल्याबद्दल त्यांचे शिवभक्त-अजित शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.व असेच कार्य करत रहा.आणि गावचे नाव मोठे करा.असे मनोगत व्यक्त केले.

ह्या उदघाटन समारंभानिमित्त ओवळे गावचे सरपंच-श्री.दिलीपनाना शिंदे,उपसरपंच-सौ.भाग्यश्रीताई साठे,ग्रा.सदस्य-पै.तुषार साठे,रामदास वाटाणे, संतोष भालेराव, भुषण कारेकर, समिर कराळे,हिरामण भालेराव तसेच गावातील अनेक ग्रामस्थ, युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!