मावळ

जगद्गुरू संत तुकाराम महाराज झाडाजवळ तुकाराम बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

गाथापारायण , प्रवचने व कीर्तने यासाठी गर्दी .

Spread the love

लोणावळा ता.२४ (प्रतिनिधी ) जगद्गुरू संत तुकाराम महाराज झाडाजवळ तुकाराम बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ता.२१ ते २८ असे करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प.तुषारमहाराज दळवी (भाजे )यांची कीर्तनसेवा झाली .तर ह.भ.प.सागर महाराज पडवळ (वेहेरगाव )यांचे प्रवचन झाले.

दुसऱ्या दिवशी ह.भ.प.अनिता महाराज मोरे( इंगवले ) यांचे प्रवचन आणि कीर्तनकार ह.भ.प.राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदिया ) यांचे कीर्तन झाले.

तिसऱ्या दिवशी ह.भ.प.शिवाजी आगिवले (कल्हाट) यांचे प्रवचन , तर ह.भ.प.पांडुरंग महाराज शितोळे (आळंदी देवाची ) यांचे कीर्तन झाले.


ता.२४ रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वरी ताई वायभट (बऊर) यांचे प्रवचन झाले.तर ह.भ.प.माऊली महाराज काकडे (धाराशीव )यांचे कीर्तन होईल..


ता.२५ रोजी ह.भ.प. ह.भ.प.सुखदेव महाराज ठाकर (नागाथली ) यांचे प्रवचन होईल आणि ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर ) यांचे कीर्तन होईल.
ता.२६ रोजी ह.भ.प.प्रविणमहाराज केदारी (ताजे) यांचे प्रवचन होईल व ह.भ.प. चांगदेव महाराज काकडे (बीड) यांचे कीर्तन होईल. ता.२७ रोजी दुपारी १० ते १२ ह.भ.प.सुभाषमहाराज गेठे (आळंदी ) यांचेसंत तुकाराम महाराज बीज सोहळा यावर कीर्तन होईल.तसेच सायंकाळी ह.भ.प.गणेश महाराज फाळके (कामशेत) यांचे प्रवचन आणि सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प.सुदर्शान महाराज शास्ञी (ञिभुनेश्वर ) यांचे कीर्तन होईल.


तसेच ता.२८ रोजी ह.भ.प. महादेव महाराज बोरूडे( शास्ञी ) यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन होईल ,असे श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज झाड पादुकास्थान सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.भरतशेठ येवले आणि सप्ताह कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प.गणपतराव भानुसघरे यांनी प्रसिध्दीस दिलेले आहे.


जगद्गुरू संत तुकाराम महाराज याःचे गाथेचे पारायण सकाळी ८ ते ११ ,पहाटे चार ते सहा काकडाआरती , दुपारी १२ ते १ गाथा भजन , सायंकाळी ४ते ५ हरिपाठ ,साडेपाच ते साडेसहा प्रवचने आणि राञी ७ते ९ हरिकीर्तन तसेच राञी ११ ते ४ हरिजागर होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!