आरोग्य व शिक्षण

आशा सेविकाच ख-या कोरोना योद्धा – आमदार सुनिल शेळके

Spread the love

मावळ : पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती मावळ आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयोजित मावळ तालुकास्तरीय आशा दिवस या कार्यक्रमात गुणवंत आशा सेविकांचा आमदार शेळके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच चिल्ड्रन व सेवाधाम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आशा स्वयंसेविका जनजागृती शिबीर घेण्यात आले. यावेळी आशा सेविकाच ख-या कोरोना योद्धा असल्याचे गौरवोद्गार मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी काढले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे मनोबल खच्ची होत असताना जीवाची पर्वा न करता आशा स्वयंसेविका यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गाव पातळीवर केलेले कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे असे आमदार शेळके म्हणाले.

या काळात माणूस माणसापासून दूर गेला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना सारख्या महामारीच्या संकटात आशा स्वयंसेविका अखंडपणे राबत होत्या. ग्रामीण भागातील ज्येष्ठांसह, मुले, महिला सर्वांनाच आरोग्य सुविधा मिळवून देण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे असेही आमदार म्हणाले.

यावेळी मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या एमडी अर्पणा जोशी, वैद्यकीय अधिकारी गणेश बुगडे, अशोक दडस,गोविंद हजारे, सर्व  प्राथमिक आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!