आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात रविवारी नियोजित रास्तारोको होणारच ;आमदारांनीही दिला बिनशर्त पाठिंबा

Spread the love

लोणावळा : लोणावळ्यात रविवारी (ता.२०) रोजी नियोजित रास्तारोको होणारच असा ठाम निर्धार लोणावळेकर सर्वपक्षिय जागृत पदाधिकारी व नागरिकांकडून जाहीर करण्यात आला.लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या समन्वय बैठकीत मावळचे आमदारांनी सुनिलआण्णा शेळके यांनी आय आर बीचे अधिकारी याँना ठोस लेखी अश्वासन द्या व अश्वासनाची कार्यवाही करा , असे आदेश दिले. तसेच आपण या रास्तारोकोला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

यावेळी शासकीय अधिकारी व बैठकीचे नियोजन करणारे मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे व कर्मचारी , आय आर बी कंपनीचे चे अधिकारी , कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे उपआभियंता प्रेरणा कोटकर , आय आर बीचे समन्वयक जयवंत डोंगरे, दुरूस्ती देखभाल विभागाचे अभियंता श्री.पत्की , यांचेसह मावळचे आमदार श्री.शेळके , लोणावळ्याचे प्रशासकीय अधिकारी श्री.जाधव, लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल , नगरपषदेचे प्रशासकीय अधिकारी , अभियंते , लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे , काँग्रेसचे , शिवसेना ,भाजप,आर पी आयचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी व माजी नगरसेवक , नगरसेविका आदी उपस्थित होते.

लोणावळ्यात वलवण ते खंडाळा या मार्गावर आपघातात अनेक तरूणांचे प्राण गेले असून काहीजण गंभीर जखमी झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ व आय आर बी फक्त आश्वासन देत असून ठोस पावले उचलत नसल्यामुळे सर्वपक्षिय जागृत नागरिकांकडून लोणावळा शहर पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांना सहा मागण्यासाठी निवेदन दिले असून ता.२० रोजी भगवान महावीर चौकात सकाळी दहा वाजता रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात आज तहसिलदार श्री.बर्गे याःनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदारांनीही रास्तारोको ला आपला बिनशर्त पाठिंबा राहील , असे सांगितले . दीड ते दोन तास चाललेल्या बैठकीत टोलवसुली , बायपास रस्ता , आणि अवजड वाहने वलवण ते थेट खंडाळा अशी विना टोलघेता सोडावीत ती एक्सप्रेस वेवरून सोडण्यात यावी आशी मागणी केली. प्रमुख मागण्या मधे १) मनशक्ती ते खंडाळा या मार्गावर रस्ता दुभाजक बसवावे .२) आपघात स्थळावर चौकात स्पीडब्रेकर बसवावेत,३) आर पी टी एस ते नाझर पाँईंट एस आकार असलेला रस्ता सरळ करून घ्यावा ४) अवजड वाहने वलवण ते थेट खंडाळा अशी विना टोलघेता एक्सप्रेस वेवरून सोडावीत , ५) अवजड वाहने ट्क , कंटेनर , ट्रेलर यांना शहरातून बंदी असावी.६)खोपोली ते लोणावळा येणारी आवजड वाहने राजमाची , खंडाळा मार्गे येतात,ती बंद करावी अशा मागण्या यात केल्या आहेत..यावेळी आमदारांनी एका अपंग व्यक्तीची आस्तेने विचारपूस केली व त्यांची समस्या सोडविण्यासाठी आपले सहाय्यक कर्मचारी यांना आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!