आरोग्य व शिक्षण

निष्ठावंत , प्रामाणिक व कार्यतत्पर आधिकारी असल्याने भगवान आंबेकर यांना संस्थेच्या प्रशासकीय कार्यप्रणालीत घेणार – गो.व्यं.शिंगरे .

Spread the love

लोणावळा : निष्ठावंत , प्रामाणिक व कार्यतत्पर आधिकारी असल्याने भगवान आंबेकर यांना संस्थेच्या प्रशासकीय कार्यप्रणालीत घेणार आसून जोपर्यत मी मुक्त करत नाही , तोपर्यंत सोडणार नाही, असे विद्या प्रसारिणी सभेचे अध्यक्ष :गो.व्यं.शिंगरे म्हणाले .

विद्या प्रसारिणी सभा, पुणे व लोणावळ्याच्या व्ही.पी.एस हायस्कूल आणि डी.पी.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मुख्य लिपिक भगवान गणपत आंबेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मानपञ देवून संस्थेचे अध्यक्ष गो.व्यं.शिंगरे आणि कार्यवाह सतिश गवळी यांचे हस्ते मानपञ व स्मृतिचिन्ह आणि शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , शाला समितीचे सदस्य अरविंदभाई मेहता, जेष्ट सामाजिक कार्यकते डाॕ.धिरूभाई टेलर , रोटरी क्लबचे संदिप आगरवाल , रेल्वेचे कामगारनेते बबनराव आंबेकर , माजी नगरसेवक नारायण आंबेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्या प्रसारिणी सभेचे कार्यवाह डाॕ.सतिश गवळी म्हणाले , २००३ ते २०२१ पर्यत लिपीक या पदावर काम करणारे श्री भगवान गणपत आंबेकर यांचेबद्दल कुणीही वाईट बोलणार नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर सलेले श्री.आंबेकर यांचे कर्तृत्व , दातृत्व आणि कर्तृत्वनिष्ठ म्हणून काम करणारे असून त्यांना दैवीहात लाभला आहे. श्री शिंगरे यांचा शुभाशिर्वाद व आई , वडील यांचे चांगले संस्कार लाभले आहेत.बाबा तथा श्री.गो.व्य.शिंगरे यांनी शब्द दिला आहे , की संस्थेच्यावतीने त्यांना कार्यकारीणीवर घेतले जाईल.३६ वर्षे प्रदिर्घ सेवा केल्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आसताना त्यांच्यासारखे काम करणे जमले पाहिजे. ते आंबेकर यांना छान जमले आहे.त्यांना कधीही मेमो मिळाला नाही. उलट त्यांनी तक्रार केल्यावर कुणाला मेमो मिळाला असेल,असे त्यांचे कर्तव्य आहे.

यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव म्हणाल्या , लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका व नगराध्यक्षा असे अनेक वर्षे काम करताना पालकांना शाळेतील प्रवेश घेताना अडचणी आल्यास ते आमच्याकडे येत. आम्ही आंबेकर सरांकडे पाठवत असायचो.आम्हाला वेळोवेळी सर सहकार्य करत असायचे त्यामुळे शेकडो विद्यार्थी घडले .शिक्षण घेवून पुढे गेले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदकुमार वाळंज म्हणाले , भगवान आंबेकर यांचेबद्दल सांगायचे म्हणजे , ते ग्रामिण भागातून येवून त्यांनी अडचणीवर मात करीत व्ही.पी.एस संस्थेमधे कामाचा ठसा उमटवला.शिक्षण क्षेत्रात स्वतःला वाहून घेतल्याने त्यांचे कुटूंबातील अनेक लोक उच्च विद्याविभूषित आहे.

यावेळी अॕड.संदिप आगरवाल म्हणाले , सदा हसतमुख चेहरा असणारे मुख्य लिपिक भगवान आंबेकर सर यांनी स्वकर्तृत्वाने ठसा उमटवला आहे. सदैव सहकार्य करण्याची भावना असल्याने आज त्यांचा मिञ परिवार मोठा आहे. सत्काराला उत्तर देताना मुख्य लिपिक श्री.भगवान आंबेकर म्हणाले. आपण व्हीपीएसचे आंबेकर सर या संस्थेच्या नावाने सर्वञ परिचित आसल्याने या नावाला जपण्यासाठी काम करत आलो.बाबा तथा श्री.शिंगरे साहेब यांचा कामाचा झपाटा ८० व्या वर्षीही मोठा वाखाणण्यासारखा आहे.आज संस्थेच्या २४ शाखा आहेत .वाकसई येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे. मळवलीजवळ शाळा काढली .ग्रामिण विद्यार्थी , विद्यार्थीनी यांची शिक्षणाची सोय झाली. बाबांनी दिल्ली , मंञालय आणि भोपाळ आसे डाॕ.सतीश गवळीसरांबरोबर प्रवास केले.त्यांचे आदेश ,सुचना पाळण्यात आल्या .शाळा समिती अध्यक्ष स्वर्गीय बच्चूभाईं पञावाला यांचे दबदब्यामुळे मी काम करत आलो. एखादी व्यक्ती पाठीमागे कौतुक करते, तेव्हा वैयक्तिक स्वार्थ नसतो.जीवन सुसह्य होण्यासाठी चांगले संस्कार महत्त्वाचे आहे.आमची घरची परिस्थिती सर्वसामान्य इतरांसारखीच होती.शेती व दुधाचा धंदा सांभाळून आई व वडील यांचे संस्कार होते. मोठे बंधू बबनराव यांचा आधार होता. पत्नी सौ.संजिवनी हिची साथ होती.कोणत्याही अडचणी चे प्रसंगी खंबीर मागे उभी राहणारी पत्नी संजिवनी आसल्याने कमी उपलब्धता असताना संसारात कसा ताळमेळ घालायचा , याबाबत तिचे कर्तृत्व आहे. मुले मुली, जावई , सुना ,उच्च शिक्षित असून परदेशात आहेत. पत्नीने पदवी घेवून शाळेत नोकरी मिळाल्यानंतर आमच्या संसारात ओढाताण कमी झाली.या शाळेला व संस्थेला कमीपणा येणार नाही , असे मी वागलो.आज १७५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सतरा प्राचार्य यांचेबरोबर काम करत आल्याने मी निवृत्त होताना समाधान आहे. श्री.आंबेकर भावनिक होत म्हणाले, यावेळी शाळेचे शाला समिती अध्यक्ष बच्चूभाईं पञावाला , सरलाताई,कुंभारे सर , स्काऊटचे तळपेसर यांची आठवण येते.असे म्हणाले .

कार्यक्रमाचे प्रारंभी सरस्वती पूजन मान्यवरांचे हस्ते झाले.काळेसर यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. प्रास्तविक भाषणात आर.डी.दरेकर यांनी मुख्य लिपिक भगवान आंबेकर यांचेबद्दल काम करताना आलेले अनुभव सांगून त्यांचे कामाचे कौतुक केले. यावेळी नियामक सभा अध्यक्ष भुरकेसर , प्रसिद्ध आर्किटेक्ट कन्हैया भुरट, उद्योजक नितीन शहा , माजी उपनगराध्यक्ष सुभाष सोनवणे, श्री.कासार सर ,चिक्की उत्पादक गिरीष पारख,लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर ,माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड , नगरसेवक निखिल कविश्वर , शिवदास पिल्ले, नगरसेविका आरोही तळेगावकर, .शिंगरे यांची नात सौ.पूजा भुरके, देवलेचे माजी उपसरपंच रामदास साठे, जेष्ट ग्रामस्थ श्री.मापारी, माजी प्राचार्य विजय जोरीसर , माजी प्राचार्य श्री .देशपांडे , तसेच भगवान आंबेकर यांचे सासरे व प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर मराठे , लोणावळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी सुरेश गायकवाड , देवलेचे माजी सरपंच रामभाऊ कोंडभर, वरसोली चे माजी सरपंच राजू खांडेभरड , माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र कल्याणजी , लिपीक कुंडलीक आंबेकर , मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई आंबेकर , जेष्ट नागरिक संघाचे सदस्य , लायन्स क्लबचे सदस्य , देवले ग्रामस्थ , लोणावळा व भाजे मळवलीच्या शाळेतील सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी मानपञ वाचन सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार जोरी यांनी केले. शिक्षिका सविता साळवेकर , शिक्षक.मानेसर आणि खेडेकर सर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक निखिल कविश्वर म्हणाले, या संस्थेचे नाते आपल्या आजोबांपासून आहे.ते येथे संस्कृत व हिंदीचे शिक्षक होते. आंबेकर सरांनी या गौळीवाडा भागातील मुलांसह पंचक्रोशितील विद्यार्थी , पालक यांचेशी चांगले संबंध ठेवले होते.

माजी नगरसेवक नारायण आंबेकर म्हणाले , आंबेकर परिवाराचे नाते शाळेबरोबर कुटूंबाचे नाते आहे.भाऊ भगवान आंबेकर यांनी व्ही.पी.एस चे कार्य सेवानिवृत्त झाल्यावरही पुढे चालू ठेवावे. भगवान आंबेकर यांचे थोरले बंधू , रेल्वेचे कामगारनेते बबनराव आंबेकर , म्हणाले ,भगवान हा लहानपणी काम कमी ;पण सतत अभ्यासात मग्न आसायचा.शिक्षणाचे महत्त्व त्याला बालपणी आई व बाबांनी समाजावून सांगितले असल्याने तो शेतीची कामे आम्ही करत आसे पण शिकून पदवीधर झाला.३६ वर्षे या शाळेत प्रामाणिकपणे त्याने सेवा केल्याने आज त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात आहेत.आमच्या सुनाही शिक्षीका आहेत.घरात ४२ लोक आहेत. घराचा कायापालट आई लक्ष्मीबाई आणि वडील गणपत आंबेकर यांचेमुळे झाला.वडील गावचे पहिले सरपंच होते..सर्वजण निर्व्यसनी व राजकारण ,कामगार क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रात आहेत.यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य लिपिक भगवान आंबेकर यांची कन्या सौ.रेश्मा खांडेभरड यांनी भाषणात वडिलांनी आपार कष्ट केल्यामुळै आज आम्ही सुस्थितीत आहोत.बहीण परदेशात आहे. माझे वडील सर्व कामात आॕलराऊंडर आहेत,त्यामुळे घरी कोणत्याही गोष्टींची कमतरता नाही.प्रत्येक कामात परफेक्ट आणि आळस कंटाळा यापासून दूर आहेत. शिक्षक श्री.मानेसर म्हणाले , .माणुसकी जपणारी माणसे दुर्मिळ आहेत.अवघड प्रसंगी सर्वांचा विचार करत असल्याने भगवान आंबेकर यांचेकडून खूप शिकायला मिळाले. श्री.खेडेकर सर म्हणाले , परिसासारखे आंबेकर सर आहेत.त्यांचेमुळे माझे सोने झाले .आपल्या परिवारातील शिक्षकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे श्री.आंबेकर राज्यात सर्व ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांची उणीव भासत राहणार असून नंतरही त्यांनी शाळेला वेळ द्यावा.

कु.आनंदी खांडेभरड या चिमुकलीने यावेळी माईक हातात घेवून आपल्या लाडक्या आजोबांना इंग्रजीमधे शुभेच्छा दिल्या. यावेळी सूञसंचालन सोमनाथ ढुमणे यांनी केले. आभार शाळेचे उपप्राचार्य शिवकुमार दहिफळे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!