ताज्या घडामोडी

फॅमिली कोर्ट ॲडव्होकेट बार असोसिएशन अहमदनगरचे पदाधिकारी यांनी नाशिक परिक्षेत्राचे स्पेशल आय. जी. श्री डाॅ. बी जी शेखर पाटील साहेब यांची  भेट

Spread the love

पोलिस प्रशासन आणि भरोसा सेल यांचे कडून येणारे अडीअडचणी संदर्भात चर्चा केली. त्यावेळी पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब, ॲडिश्नल एस पी श्री सौरभ अग्रवाल साहेब उपस्थित होते. सर्व पोलिस अधिकारी यांचा फॅमिली कोर्ट ॲडव्होकेटस् बार असोसिएशन अहमदनगर चे वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित केलेल्या अडीअडचणी बाबत श्री. शेखर पाटील साहेब यांनी सांगितले की, यापुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आमची कोणत्याही पोलिस अधिकारी यांचे विरोधात तक्रार नाही पण वकील आणि पक्षकार यांना वाईट प्रकारची वागणूक मिळू नये व त्यांचे अखत्यारीत असणारे कामे वेळेवर व्हावीत हिच अपेक्षा आहे वकील संघाची आहे. याबाबत पोलिस अधीक्षक श्री पाटील साहेब यांना पण मदत करण्यासाठी सांगितले असता एस पी श्री पाटील साहेब आणि श्री अग्रवाल साहेब यांनी सुध्दा मदत करण्याचे आश्वासन दिले.
फॅमिली कोर्ट मधून गेलेले समन्स, वाॅरंट यांची बजावणी वेळेवर होत नाही, तसेच रिपोर्ट सुद्धा वेळेवर येत नाहीत. महिलांना आणि पुरूषांना त्यांचे फॅमिली प्रकणात मदत करणे कामी भरोसा सेल ची निर्मिती अहमदनगर येथे झाली आहे. परंतु अनेक लोकांना तेथे मेडिएशन साठी असलेले मेडिएटर व्यवस्थित वागणूक देत नाहीत. तसेच एखाद्या व्यक्तीचे न्यायालयात प्रकरण चालू असेल तर त्याबाबत सुद्धा दखल घेतली जात नाही. तसेच वकीलांना सुद्धा चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे भरोसा सेल मध्ये प्रशिक्षीत आणि अनुभवी महिला व पुरुष पोलिसांची नेमणूक केली असे प्रश्न उद्भवणार नाहीत अशी विनंती वकील संघाचे पदाधिकारी यांनी केली आहे. या बाबतीत पोलिस प्रशासन यांचे कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड शिवाजी अण्णा कराळे, उपाध्यक्ष ॲड लक्ष्मणराव कचरे,कार्याध्यक्ष ॲड सुरेश लगड, सचिव ॲड अनिताताई दिघे, सह सचिव ॲड अर्चनाताई शेलोत खजिनदार ॲड राजेश कावरे, सदस्य ॲड एम बी अंबेकर, ॲड राजाभाऊ शिर्के ॲड शिवाजी सांगळे, ॲड अनुराधाताई येवले, ॲड सुचिताताई बाबर ॲड सत्यजीत कराळे हे सर्व उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!