ताज्या घडामोडी

बिळाशी गावच्या विकासात वनविभागाच्या योजना राबवून सहकार्य करू: मुख्य वनसंरक्षक  एन.आर.प्रविण

Spread the love

कोकरुड /वार्ताहर
गावच्या विकासात योगदान असणाऱ्या वनविभागातील योजना राबविण्यासाठी सहकार्य करू असे प्रतिपादन पुणे येथील वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण यांनी केले. ते बिळाशी ता शिराळा येथे महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या संरक्षण कुटीच्या भुमिपुजन समारंभात बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील,सांगलीच्या उपवनसंरक्षक निताताई कट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना एन. आर. प्रविण पुढे म्हणाले की, भुमिपुजन कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान असणाऱ्या ऐतिहासिक बिळाशी गावात भेट देता आली. आपली जन्मभुमी असणाऱ्या बिळाशी गावच्या विकासासाठी योगदान देऊन विधायक कामासाठी झटणारे अधिकारी राहुल पाटील यांचे काम कौतुकास्पद आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ मारुन बांधण्यात येणाऱ्या कुटीचे भुमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी राहुल पाटील, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट, माजी उपसभापती आनंदराव पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, प्रचितीचे संचालक एस. वाय. यमगर यांनी आपली मनोगती व्यक्त व्यक्त. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजने, शिराळा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, डॉ. एन.के.पाटील,माजी सरपंच विश्वास पाटील, बी. एम. साळुंखे, निनाईचे संचालक बाजीराव पाटील, प्रचितीचे उपाध्यक्ष प्रकाश धस,दादासो यमगर,सरपंच कल्पना यमगर, उपसरपंच सुवर्णाताई साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मगदूम, विनायक पाटील, विकास पांढरे,ईंदुताई यमगर, संतोष पाटील, शामराव पाटील, दिलीप कुंभार, डॉ. के. जी. माळी, सुरेश पाटील, विशाल नायकवडी, विजय जाधव, दिपक मस्कर, विश्वास पाटील, विजय साळुंखे,वनपाल चंद्रकांत देशमुख, प्रकाश पाटील, दत्तात्रय शिपेकर, आनंदा पाटील, स्वराज्य फौंडेशनचे प्रकाश पाटील, नागेश शिंदे, डी. के. कुंभार, सागर पाटील, गणेश साळुंखे,विकास देशमाने, उमेश नवाळे, नाना फडतरे आदींसह बिळाशी ग्रामपंचायतीचे सदस्य , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील, प्रास्ताविक दत्तात्रय शिपेकर तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!