ताज्या घडामोडी

कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्यावरील झुडपे काढण्याची मागणी

Spread the love

कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्यावरील दुतर्फा झुडपांमुळे रस्ता अरुंद झाला असून,रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.”

डॉ.अभिजीत जाधव
अध्यक्ष
रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर.

कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्यावरील झुडपे काढण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.
कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रामधे दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची तपासणी केली जाते.पोर्ले गावापासून नांदगाव पर्यंत चे रुग्ण तपासणीसाठी येत असतात.कोतोली मुख्य रस्त्यापासून आरोग्य केंद्रापर्यंत असणार्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी झुडपे ही रस्त्यावर आलेली आहेत. ,रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. तसेच रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने एकावेळी ओव्हरटेक करु शकत नाहीत.रस्त्याकडेची जागा भुसभुशीत असल्यामुळे रुग्ण घेऊन येणारी वाहने अडकून बसण्याच्या घटना घडत आहेत.
रस्त्यावर अनेकवेळा वाहने उभी केलेली असलेने ईमर्जन्सी रुग्ण घेऊन येणार्या रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
सामान्य नागरिकांचा आधारवड असणार्या या आरोग्य केंद्राच्या रसत्यावरील रस्त्यावरील झुडपे काढणे,खड्डे बुजविणे आणि रुंदीकरण करण्याची मागणी डॉ.जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!