ताज्या घडामोडी

जयंत पाटलाला विरोध हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम

Spread the love

इस्लामपूर दि.२१ प्रतिनिधी

शहराच्या विकासाचे,जनतेच्या हिताचे काही घेणे-देणे आहे का नाही,हे माहीत नाही. मात्र शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे शहर पुन्हा दुरुस्त करण्यासाठी,या शहराच्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा रहा,असे आवाहन माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर शहरातील सदिच्छा भेट दौऱ्यात बोलताना केले.
आ.पाटील यांनी यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ८,९,४,१३,११ व १ मध्ये सदिच्छा भेट बैठका घेत शहरातील जेष्ठ नागरिक,महिला, युवक आदी विविध घटकांशी संवाद साधला. युवा नेते प्रतिकदादा पाटील,अँड.चिमणभाऊ डांगे,शहाजीबापू पाटील,खंडेराव जाधव, सुभाषराव सुर्यवंशी,अँड.धैर्यशील पाटील, अरुण कांबळे,रोझा किणीकर,संदीप पाटील,शंकरराव चव्हाण,सचिन कोळी, स्वरूप मोरे,शैलजा जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या समवेत होते.
आ.पाटील म्हणाले,गेल्या निवडणुकीत आपण ३१ वर्षानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करून एक वेगळा पर्याय निवडला. मात्र या पर्यायाने गेल्या पाच वर्षात शहराची प्रगती झाली का अधोगती झाली? याचा विचार आपण करणार का नाही? आम्ही या निवडणुकीत कोणावर टीका- टिपण्णी करण्यात वेळ न घालविता या शहराच्या खुंटलेल्या विकासाला कशी चालना देणार हे आपणास सांगणार आहोत. या निवडणुकीत सर्वांना विश्वासात घेत सर्वांना मान्य असे उमेदवार देण्यात येतील.
शहाजी पाटील म्हणाले,काही मंडळी नामांतराचा घाट घालत शहरात विष पेरत आहेत. आम्ही ईश्वराची पूजाअर्चा करतो, आमचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र उरून इस्लामपूरची अस्मिता पुसणार का?
पै.भगवान पाटील म्हणाले,विरोधकांच्या मध्ये अनेक गट-उपगट आहेत.कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यांनी शहराच्या विकासाकडे मोठे दुर्लक्ष केले आहे.
खंडेराव जाधव म्हणाले,राज्यातील एका सुंदर व प्रगत शहराची वाट लावली आहे. नगराध्यक्ष हे केवळ बोलबच्चन आहेत.
रोझा किणीकर म्हणाल्या,पिण्याच्या पाण्याची ओरड,बागांची दुर्दशा,साथीच्या आजारांच्या प्रसाराचा शहरातील महिलांना जास्त त्रास झाला आहे. त्या नक्की या राजवटीचा विचार करतील.
माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा मांडत डांगे चौकातील अद्यावत भाजी मंडई चालू करण्याचे औदार्य सत्ताधारी दाखवू शकले नाहीत,असा टोला मारला. यावेळी सूर्याजी पाटील,गुरू माने,राहुल नागे,रणजित तेवरे यांनीही मनोगत व्यक्त केली.
माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,जेष्ठ नगरसेवक बाबासो सुर्यवंशी,आनंदराव मलगुंडे,डॉ.संग्राम पाटील,पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,जयश्री माळी,सुनीता सपकाळ,संगिता कांबळे, श्रीकांत माने,हणमंत माळी,विलास भिगार्डे, शंकरराव पाटील,आनंदराव पाटील,अभिजित पाटील, सुनील मलगुंडे,प्रा.अरुण घोडके, अबिद मोमीन, शकील जमादार,कविता पाटील,प्रवीण पाटील,विनायक सदावर्ते, श्यामजी पटेल,अमोल वीरकर,निवास जाधव,किरण माने,मोहन भिंगार्डे,सुनील भोसले,धनाजी देशमुख यांच्यासह माजी नगरसेवक,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या सदिच्छा भेट दौऱ्यात सहभागी झाले होते.

वाळवा तालुक्याची क्रांतिकारी परंपरा।।
सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. कोणी याविरुध्द बोलला,तर त्याच्या मागे ईडी लावली जाते. मात्र क्रांतिसिंह नाना पाटील,क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यापासून जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभा रहाण्याचे,जे खरे आहे ते बोलण्याची वाळवा तालुक्याची क्रांतिकारी आहे,आम्ही ही परंपरा निश्चितपणे पुढे चालवू,असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला.इस्लामपूर येथील प्रभाग ११ मधील सदिच्छा भेट बैठकीमध्ये बोलताना आ.जयंतराव पाटील.व्यासपीठावर प्रतिक दादा पाटील,आनंदराव मलगुंडे,शहाजीबापू पाटील,धैर्यशील पाटील,शंकरराव पाटील,सुनीता सपकाळ,संगिता कांबळे व मान्यवर. इस्लामपूर येथील प्रभाग १३ मधील सदिच्छा भेट बैठकीमध्ये बोलताना आ.जयंतराव पाटील. व्यासपीठावर प्रतिक दादा पाटील,शहाजीबापू पाटील,पै.भगवान पाटील,दादासो पाटील,शंकरराव पाटील, सुभाषराव सुर्यवंशी,व मान्यवर. इस्लामपूर येथील प्रभाग ८ मधील सदिच्छा भेट बैठकीमध्ये बोलताना आ.जयंतराव पाटील. व्यासपीठावर विश्वनाथ डांगे,शहाजीबापू पाटील,बाबासो सुर्यवंशी, मुनीर पटवेकर,पिरअली पुणेकर व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!