ताज्या घडामोडी

वीज दरवाढ तात्काळ मागे घ्या रिपब्लिकन पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

महावितरण कडून चालू महिन्यात दरवाढीचे जाहीर केलेले वेळापत्रक डोंगरी विभागातील सामान्य ग्राहकांवर अन्याय करणारे असून ते परवडणारे नाही, त्याचा विचार करून सध्या झालेली वीज दरवाढ सरकारने तात्काळ मागे घ्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा शिराळा यांच्यावतीने देण्यात आले आहे.
महावितरण कंपनीने जानेवारी 2022 मध्ये देखील प्रति युनिट पंचवीस पैशाची दरवाढ केली होती त्यावेळी समायोजन आकाराची कारण दिले होते हा सामान्य विज ग्राहक कावर मोठ्या अन्याय आहे यामुळे सतत वाढीव होणारा वीज आकार गरिबांना परवडणारा नाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विचार करून ही दरवाढ तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर कार्याध्यक्ष पांडुरंग नांगरे उपाध्यक्ष विठ्ठल सोनवले विलास कांबळे मुकुंद कांबळे किरण कांबळे सौ दिपाली कांबळे अशोक झाडे सुरेश घोलप शिवाजी कांबळे सखाराम कांबळे उमेश काळे अधिक पोळ आकाश कांबळे शामराव कांबळे विकास वाघमारे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!