ताज्या घडामोडी

कस्तुरी शिक्षण संस्थेचा” एकोणीसावा वर्धापन दिन उत्साहात पार

Spread the love

सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधत कस्तुरी कॉलेजमध्ये समारंभाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून फॅमिली कोर्ट रिटायर्ड जज मा. शहापूरकर साहेब उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ सौ. रेखा नगरकर या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून आणि हायकोर्ट मुंबई एडवोकेट हिमांशू नगरकर हे देखील उपस्थित होते.
सदर उद्घाटन प्रसंगी शहापूरकर साहेब तसेच कस्तुरी शिक्षण संस्थेचे फाउंडर श्रीयुत. पंडित पलांडे तसेच प्रेसिडेंट सौ. जयश्री पलांडे आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर प्रतिक पलांडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
वरील कार्यक्रमात शाळा व कॉलेजमध्ये उल्लेखनीय काम व चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान कस्तुरी स्कूल ऑफ लॉ तर्फे मोफत कायदेशीर सल्ला व सहाय्य सप्ताह आयोजित केला आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या कौटुंबिक व मिळकत विषयक तसेच अन्य अडचणींबाबत मोफत सल्ला देण्यात येईल.
मोफत सल्ला व सहाय्य करण्यासाठी पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ तसेच ज्येष्ठ समुपदेशक उपस्थित राहणार आहेत. सदर वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील वकीलवर्ग आणि समुपदेशक तसेच घोडनदी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष एडवोकेट सरिता खेडेकर व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट अनिषा फणसळकर, एडवोकेट सुरेखा दाबी, एडवोकेट नीलिमा चव्हाण, एडवोकेट संध्या बागुल, एडवोकेट प्रज्ञा वैद्य, एडवोकेट पियाली घोष तसेच ज्येष्ठ समुपदेशक सौ रश्मि जोशी ,सौ माणिक दांडे तसेच मिस मोना मोरे या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. याप्रसंगी संस्थेतर्फे सर्व वकील व समुपदेशकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या पूर्ण सप्ताहात सामान्य लोकांच्या अनेकविध अडचणी व कौटुंबिक कलह, घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार, तसेच लहान मुलांचे हक्क व अधिकार, मुलांकरता कौन्सिलिंग ,शेती विषयक कायदे इत्यादी साठी कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. त्याकरिता शिक्रापूर आणि शिरूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन कस्तुरी शिक्षण संस्थेतर्फे डॉक्टर सपना देव यांनी केले आहे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!