ताज्या घडामोडी

विश्वास कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेती प्रशिक्षणासाठी वसंतदादा साखर संकुल मांजरी बुद्रूक (पुणे) रवाना करण्यात आले. आज कारखाना स्थळावरून तानाजी यशवंत जाधव (वाकुर्डे बुद्रुक), सदाशिव मारुती कुराडे व अर्जुन दत्तात्रय शिराळा (दोघे मांगले), शामराव अण्णा साळुंखे (ढोलेवाडी), बाबुराव विष्णू कळंत्रे (आरळा), बापू शंकर पाटील (माणगांव), डॉ. संजय विठ्ठल लाळे (ओकोली), संदीप रंगराव दळवी (थेरगांव) हे प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना झाले. या सर्व मंडळींना घेवून जाणाऱ्या वाहणाचे पुजन कारखान्याचे संचालक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी करून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. आधुनिक ऊस शेतीचे प्रशिक्षण घेवून परतल्यानंतर या शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा फायदा द्यावा. त्यांनाही अधुनिक ऊस शेतीसाठी प्रशिक्षीत करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!