ताज्या घडामोडी

सर्वांनी एकजुटीने काम करा : नीतेश राणे भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

Spread the love

महाविकास  आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण शिंदे फडणवीसांच्या महायुती सरकारमुळेच पुन्हा मिळाले आहे. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखविले आहे. भाजप महायुती सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे आरक्षण मिळाले आहे. त्याबाबत समाधान व्यक्त करीत आमदार नितेश राणे यांची भटके विमुक्त भाजप आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. तसेच ‘पुष्पगुच्छ देऊन आमदार राणे यांचे आभार मानले.

यावेळी ओबीसी समाजाचे नेते, भाजप उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा सचिव, तळेरे गावचे रहिवासी नामदेव चव्हाण, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, लोकसभा संघटक

कणकवली येथे भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हा पदाधिकायांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. तसेच ओबीसी आरक्षणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.वसंत चव्हाण, बाळकृष्ण खरात, राजू शिंदे, गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांच्या निवडीबद्दल दोघांनाही आमदार नीतेश राणे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.भटके विमुक्त आघाडीच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या कामाबद्दल आढावा देत असताना त्यावर आमदार यावेळी दिला.

राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या कार्यप्रणालीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. एक उत्कृष्ट भाषणशैली असलेले शांत व अभ्यासू नेतृत्व भटके विमुक्त आघाडीचे नेते आमच्या पक्षाकडे आहे.त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा असून तुम्ही सर्वांनी एकजुटीने काम करा लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला देऊ, असा शब्द आमदार नितेश राणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!