आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

लोकवर्गणीतून हायकोर्टाची रक्कम जमा करणार …. मिलिंद अच्युत.

हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावणी आधी 3 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Spread the love

 

लोकवर्गणीतून हायकोर्टाची रक्कम जमा करणार …. मिलिंद अच्युत.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ ऑक्टोबर.

मुंबई-पुणे-बंगळुर या जुन्या महामार्गावरील सोमाटणे येथील टोल वसूलीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावणी आधी 3 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग 48 च्या (मुंबई-पुणे-बंगळुरु) पुणे येथील सोमाटणे फी प्लाझावरील टोल वसुलीला हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचं यात उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून केलेला आहे.

प्रमुख याचिकाकर्ते मिलिंद अच्युत यांनी लोकवर्गणीतून व लोक सहभागातून सदर तीन लाख रुपये अनामत रक्कम भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही राजकारणी मंडळीं सोमाटणे टोलनाका बंद होऊनये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून इथून पुढील लढाई न्यायालया मार्फतच लढणार असल्याचे अच्युत यांनी सांगितले.

टोल नाका सुरू झाल्यापासून स्वर्गीय सतीश शेट्टी यांनी धनशक्ती विरोधात दंड थोपटले होते त्यानंतर सदर सोमाटणे टोल नाक्या बाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतर असा विश्वास बसला आहे की सदर टोल नाका हा अनाधिकृत आहे व वतो कुठल्याही नियमात बसणारा नाही. त्यामुळे सोमाटणे येथील टोलनाका हा इतरत्र हलवून स्थानिकांना या टोल धाडी पासून सुटका मिळावी. हा लढा अतिशय खडतर आहे, राजकीय मंडळी यात ढवळाढवळ करून मानसिक खच्चीकरण करत आहेत परंतु कितीही वेळ लागला तरी शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा लढणार आहे असे मिलिंद अच्युत यांनी नमूद केले आहे.

आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते असून हा टोल नाका सर्व समाजाचा सांघिक विषय असून कुण्या एकाचे घरचे किंवा वैयक्तिक कार्य नाही त्यामुळे सर्व समाजाने फुल ना फुलाची पाकळी मदत करणे अपेक्षित असल्याने सर्वांनी यथा शक्ती आर्थिक मदत करून अनामत रक्कम भरण्यासाठी जनशक्ती ची ताकद उभी करावी असे आवाहन यावेळी मिलिंद अच्युत यांनी केले आहे. तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी आम्ही हाय कोर्टामध्ये केली असता सदर अनामत रक्कम भरण्याचे कोर्टाने निर्देश दिले असल्यामुळे येत्या आठ दिवसात सदर अनामत रक्कम भरावयाची आहे, तरी तमाम मावळवसियानी यथाशक्ती रक्कम खालील Google pay अकाउंटवर भरावी असे आव्हान यावेळी मिलिंद अच्युत यांनी केले आहे.
Google pay no
9922859922

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!