ताज्या घडामोडी

नाग पंचमी निमित्त जनजागृती कार्यक्रम

Spread the love

वन विभाग सांगली, वनपरिक्षेत्र शिराळा यांचे वतीने श्रीमती नीता कट्टे उपवनसंरक्षक सांगली, डॉ अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली, श्री सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा यांचे मार्गदर्शनाखाली मौजे येलूर ता वाळवा येथील येलूर हायस्कूल, येलूर येथे नागपंचमी निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सर्प विषयी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. नागपंचमी दिवशी नागाच्या प्रतीकात्मक मूर्तीचे पूजन करण्याचे आवाहन श्री सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री एस एल पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री पी एस पाटील सर, डी पी पाटील सर, एस डी यादव सर, एस के शिंदे सर ए.पी बनसोडे मॅडम एस एच माळी मॅडम सौ व्ही एस पाटील मॅडम प्राणी मित्र युनुस मणेर, प्रदिप जाधव, दादाराव पाटील, गणेश भोसले, संतोष पाटील, ऋतुराज पाटील हे उपस्थित होते. उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री यु व्ही शिणगारे सर यांनी केले तर आभार श्री एस एन कासोटे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!