ताज्या घडामोडी

इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यानंतर दीड-दोन वर्षात शहरा तील रखडलेली भुयारी गटारी योजना व रस्त्यांची कामे मार्गी लावू

Spread the love

इस्लामपूर दि.३० प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील प्रभाग बैठकीत बोलताना व्यक्त केला. आपल्या शहरास पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आपल्या अपेक्षा,सूचना आम्ही सुरू केलेल्या वेबसाईट,वॉट्सअप क्रमांकावर कळवाव्यात,असे त्यांनी नागरिकांना आवाहन ही केले.
इस्लामपूर येथील माणकेश्वर हॉलमधील प्रभाग क्रमांक ७ च्या सदिच्छा भेट बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते संजय कोरे,माजी नगराध्यक्ष अँड.चिमणभाऊ डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,उपनगराध्यक्ष दादासो पाटील, अँड.धैर्यशील पाटील,माजी नगरसेविका जयश्री माळी,माजी नगरसेवक बशीर मुल्ला,महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, अरुणभाऊ कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आपल्या शहराचा एक प्रगत शहर म्हणून राज्यात नावलौकिक होता. मात्र गेल्या ५ वर्षांपूर्वी ज्यांच्यावर शहराने जबाबदारी टाकली होती,त्यांनी शहराच्या विकासाला चालना देण्यात,शहरात नव- नवीन विकास कामे करण्यात फारसा रस दाखविलेला नाही. जे शहरात सत्तेवर होते, त्यांचेच राज्यात सरकार होते. मग त्यांनी त्यांच्या वचननाम्यातील कोणते वचने पूर्ण केली आहेत? याचे चिंतन करण्याची गरज आहे. आम्ही गेल्या अडीच वर्षात राज्यात सत्तेवर आल्यानंतर मोठया प्रमाणात निधी आणून शहरातील विकास कामांना चालना दिली आहे. संजय कोरे यांना नगरपालिके तील कामाचा दांडगा अनुभव असून त्यांनी पुन्हा या प्रभागाचे प्रतिनिधित्व करावे. आजच मी त्यांची उमेदवारी जाहीर करतो.
संजय कोरे (अण्णा) म्हणाले,लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यानंतर या शहरा बद्दलची आपुलकी व प्रेम आ.जयंतराव पाटील यांनी जपले आहे. या शहरातील पिण्याचे पाणी व रस्त्यांसह शहराचे सर्व प्रश्न आ.जयंतराव पाटील हेच सोडवू शकतात. आपल्या शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आ.जयंतराव पाटील यांना साथ देऊया.
प्राचार्य राजेंद्र कुरळपकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या ३५ वर्षात इस्लामपूर शहराचा शाश्वत विकास केला असून येत्या नगर पालिकेच्या निवडणुकीत ते देतील त्या उमेदवारांना निवडून देऊया,असे त्यांनी आवाहन केले. माजी नगरसेविका जयश्री माळी यांनी आभार मानले. दीपक कोठावळे यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, नजीर मुल्ला,जावेद मोमीन,प्रियांका साळुंखे यांच्यासह नवीन प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्लामपूर येथील प्रभाग क्रमांक ७ मधील बैठकीप्रसंगी वेब साईटचे उदघाटन करताना आ.जयंतराव पाटील. समवेत संजय कोरे,अँड.चिमणभाऊ डांगे, शहाजी पाटील,दादासो पाटील,अँड.धैर्यशील पाटील,जयश्री माळी,प्राचार्य राजेंद्र कुरळप कर व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!