ताज्या घडामोडी

मानव कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य NGO च्या सातारा जिल्ह्यातील निवडी ओगलेवाडी येथील न्यु इंग्लिश स्कूल सदाशिवगड येथे पार

Spread the love

मानव कल्याणकारी संघटना,महाराष्ट्र राज्य NGO ची बैठक संस्थापक/राज्य अध्यक्ष मा.सलिम पटेल(भैया) यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष मा.अंकुशराव कणसे, मा.शशांक नांगरे, राज्य कार्यकारीणी सदस्य मा.रफिक मुल्ला, मा.निवासराव माने, मा.रत्नमाला पाटील व मानव कल्याणकारी महात्मा फुले विचार मंचाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.निसार मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न झाली.त्यावेळी मानव कल्याणकारी महात्मा फुले विचार मंचाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी मा.सुजीत माने, ओगलेवाडी विभाग प्रमुख पदी मा.मनोजदादा सुर्वे, कराड उत्तर तालुका संघटक पदी मा.सुनिल डांगे, महिला आघाडी कराड दक्षीण तालुका उपाध्यक्ष पदी मा.अर्चना जाधव, कराड शहर अध्यक्ष पदी मा.किर्ती डोईफोडे, कराड शहर उपाध्यक्ष पदी मा.लता चव्हाण, मलकापूर शहर अध्यक्ष पदी मा.मनीषा पाटील व सदस्य पदी मा.परवीन मुल्ला यांची निवड करण्यात आली.*
त्यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना मा.सलिम पटेल (भैया) म्हणाले की ही संघटना कोणत्याही पक्ष पार्टी च्या विरोधात नसुन सर्वसामान्य जनतेचे अधीकार जनतेला मिळवून देण्यासाठी व अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारण्यासाठी मानव कल्याणकारी संघटनेची वाटचाल सुरू राहील असे विचार त्यांनी व्यक्त केले. व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्र बद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. बैठकीस विशेष सहकार्य मा.कल्याणराव डुबल यांचे लाभल्याबद्दल त्यांचे आभार सातारा जिल्हा अध्यक्ष मा.नितीनभाऊ आवळे यांनी मानले व शेतकरी संघटनेचे नेते कै.साजिद मुल्ला व आमचे सहकारी मा.शब्बीर देसाई यांच्या पत्नी कै.मिनाज देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थीतांचे स्वागत कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष मा.विजय भोसले यांनी केले तर आभार कराड उत्तर तालुका अध्यक्ष मा.विशाल पुस्तके यांनी मानले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.अनिलदादा कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष मा.राजमहम्मद पठाण, जिल्हा संघटक मा.प्रकाश पवार, समाजिक कार्यकर्ते मा.मिलींद माने, विरवडे गावचे नेते मा.अभय भोसले, कराड दक्षीण महिला आघाडी अध्यक्षा मा.लक्ष्मीताई काळे, कराड उत्तर तालुका कार्याध्यक्ष मा.धनंजय राजमाने, कराड शहर अध्यक्ष मा.समिर बागवान, शहर उपाध्यक्ष मा.राहुल जाधव, विरवडे शाखा अध्यक्ष मा.रमेश धोकटे, युवकचे पाडळी(केसे) शाखा अध्यक्ष मा.अरबाज पटेल, मसुर शाखा अध्यक्ष मा.दिलावर मुल्ला, मसुर शाखा संघटक मा.जितेंद्र गरवरे, मा.प्रथमेश पाटील, मा.अनिता थोरात, मा.अनिता मोरे, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा.इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष मा.शरद चव्हाण, कराड तालुका अध्यक्ष मा.सचिन भिसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!