ताज्या घडामोडी

सोयाबीनच्या संवेदनशील अवस्थेत काळजी घ्या डॉ ढगे

Spread the love

नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथील सोयाबीन प्रक्षेत्राला कृषी शास्त्रज्ञ डॉअशोकराव ढगे यांनी संभाजीराव कुताळ लोखंडे व शेतकऱ्या समवेत भेटी देऊन पाहणी केली सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेमध्ये पदार्पण करत आहे पिकाच्या वाढीची नाजूक व संवेदनशील अवस्था आहे सध्याच्या ढगाळ हवामानामुळे या पिकाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे स्पष्ट प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉअशोक ढगे यांनी केले आहे पिकाची शेंड्याकडील पानेपिवळी पडत आहेत व संपूर्ण प्लॉट पिवळा होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण होत आहे त्यासाठी हारुपावडर तीन ग्रॅम एक लिटर पाण्यातून फवारणी करावी त्यामुळे पिवळेपणा कमी होईल तसेच 19 19 19खताची फवारणी करावीढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रभाव वाढू नये यासाठी व पिवळेपणा कमी करण्यासाठी पोटॅशियम सल्फेट तीन किलो 100 लिटर पाणी व त्याबरोबर बुरशीनाशक बाविस्टीन यांची फवारणी करावी भरगोस उत्पादनासाठी या संवेदनशील व नाजुकअवस्थेमध्ये काळजी घेणे आवश्यक आहेकीटकनाशकाची बुरशीनाशकाची व विद्राव्य रासायनिक खताचे फवारणी केल्यास उत्पादन वाढीसमखास मदत होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!