ताज्या घडामोडी

तंदुरुस्तीसाठी धावणे हा उत्तम व्यायाम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे प्रतिपादन

Spread the love

पालघर मध्ये रोड रेसला उदंड प्रतिसाद
प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. ६
तरुणांनी तंदुरुस्त राहणे अत्यंत गरजेचे असून धावण्यासारखा व्यायाम प्रकार निश्चितच शरीराला फलदायी आहे. तंदुरुस्तीसाठी धावणे हे अत्यंत फायद्याचे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना रोड रेस ही स्पर्धा मोलाची ठरेल असा विश्वास पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पालघर जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी पालघर व रोटरी क्लब ऑफ पालघर यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी रोड रेस स्पर्धेचे भव्य आयोजन पालघर येथील हुतात्मा चौकामध्ये करण्यात आले होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी बोडके यांनी या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा लाभलेल्या प्रचंड प्रतिसादा बद्दल आनंद व्यक्त केला. तर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी कोरोनाच्या महाआपत्तीनंतर प्रथमच जिल्ह्यातील ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजन करून खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे विशेष अभिनंदन केले. तर पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी रोड रेसच्या स्पर्धेमध्ये शालेय मुलींचा सहभाग उल्लेखनीय असून आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलींचा हा सहभाग निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आमदार श्रीनिवास वनगा, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमाठ, पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, पालघर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक भगवान पाटील, पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाज खुशरू इराणी, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवडंकर, क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, राकेश सावे, नगरसेवक सुभाष पाटील, पालघर तालुका गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते, रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख उपेन वर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.
१४/१६/१८ व खुला गट अशा चार गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. यामध्ये विविध गटांना १० किमी, ६ किमी, ४ किमी, ३.५ व २ किमी अंतराची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये सुमारे १६०० पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्या तीन क्रमांक पर्यंत पदक, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र तर सहा क्रमांक पर्यंत रोख रक्कम व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघर चे गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते, प्राध्यापक घुगे तसेच पालघर जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी दहा किलोमीटर अंतर यशस्वीपणे पार केले.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन दर्शन भंडारे यांनी केले. या रोड रेस ला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या आयोजनासाठी पालघर जिल्हा स्काऊट अँड गाईड कार्यालय, महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर, पालघर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि पालघर तालुका व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.

रोड रेस स्पर्धेचा निकाल…
खुला गट( मुलगे /मुली )
प्रथम क्रमांक:- विजय मोरघा / निकिता वायेडा
द्वितीय क्रमांक :- रोहिदास मोरघा/ कविता भोईर
तृतीय क्रमांक:- सचिन भुसारा/ शर्मिला हाडळ

१८ वर्षाखालील ( मुलगे /मुली )
प्रथम क्रमांक :- महेश भोरे /दिव्या पिंगळे
द्वितीय क्रमांक:- विशाल उंबरसाडा/ वर्षा हाडळ
तृतीय क्रमांक :- विकी धोडी /भूमिका भोये

१६ वर्षाखालील( मुलगे/ मुली )
प्रथम क्रमांक :- अतुल चिभडे/ अदिती पाटील
द्वितीय क्रमांक:- दिषेस थोडी/ रोहिणी दांडेकर
तृतीय क्रमांक:- करण भोये /वैदेही कुडू

१४ वर्षाखालील ( मुलगे/ मुली )
प्रथम क्रमांक :- मयूर धोडी /भावना फरळे
द्वितीय क्रमांक:- संजय भीमरा /अंकिता बुजुड
तृतीय क्रमांक:- रुद्र किणी / शर्वी मोरे

सदर स्पर्धेसाठी रोटरी क्लब पालघर यांनी खेळाडूंना टी-शर्ट, स्नॅक्स, पिण्याचे पाणी आणि बॅनर्स उपलब्ध करून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!