क्रीडा व मनोरंजन

कांगा स्पर्धेसाठी सेंट्रल मैदान उपलब्ध

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई : ठाण्याचे प्रसिद्ध सेंट्रल मैदान डॉ. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती स्पोर्टिंगचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी दिली. २५ वर्षापूर्वी या स्पर्धेतील शेवटचे दोन सामने सेंट्रल मैदानावर खेळले गेले होते. दसऱ्यानंतर सेंट्रल मैदान कांगा स्पर्धेसाठी बदली मैदान म्हणून उपलब्ध होईल. ४ आणि ११डिसेंबरला होणारे अंतिम दोन साखळी सामने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या शताब्दी वर्षात सेंट्रल मैदानात आयोजित करण्यात यावेत अशी विनंती आपण एमसीएला करणार असल्याचे डॉ. मढवी यांनी सांगितले. डॉ. मढवी हे एमसीएच्या मैदान उप समितीचे सदस्य आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!