ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजी व मासे विक्रेत्यांना परवाना वाटप

Spread the love

मुंबई – प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाच्या नात्याचा सण म्हणुन साजरा केला जातो. याच सणाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुका कॉंग्रेसच्यावतीने चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर मार्केटमध्ये भाजी व मासे विक्रेत्यांना नुकतेच मोफत खाद्यान्न परवाना वाटप करण्यात आले.

चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक सावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यां वंदना सावंत यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये चेंबूरमधील ज्येष्ठ पत्रकार शंकर कडव यांच्या हस्ते भाजी व मासे विक्रेत्यांना मोफत खाद्यान्न परवाना वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील,तालुका उपाध्यक्ष रामचंद्र मिस्त्री, तालुका सचिव लीना मस्के,महिला तालुका उपाध्यक्ष लता घाडगे, तालुका सचिव रक्तप्रवाह मेजरे,उपाध्यक्ष संजय प्रजापती,वॉर्ड अध्यक्ष महादेव शिंदे तसेच अन्य पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!