ताज्या घडामोडी
घबकवाडी येथे उद्या सर्व ग्रामस्थांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन
लोक नियुक्त सरपंच श्री. संजय कदम
उद्या शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सांगली मधील डाॅ. नेत्रतज्ञ डाॅ. शेखर परांजपे यांचे मार्फत घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामस्थांसाठी मोफत “डोळे तपासणी ” शिबीराचे सकाळी ठिक ९:०० ते दुपारी ३:०० या वेळेत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गांवचे लोकनियुक्त सरपंच श्री संजय कदम (बापू) यांनी दिली आहे.
गावातील सर्व ग्रामस्थांनी या डोळे तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. घबकवाडी ग्रामपंचायतीचे वतीने सदर शिबीराचे नियोजन केले आहे. सदरचे शिबिर हनुमान मंदिर येथे आयोजित केले असून सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी केले आहे.