Puneक्राईम न्युजमहाराष्ट्र

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे २ कोटीचे ड्रग्स (अमली पदार्थ )जप्त.

१ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत.

Spread the love

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे २ कोटीचे ड्रग्स (अमली पदार्थ )जप्त ; १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत.Around 2 crore worth of drugs seized at the entrance of Sassoon Hospital in Pune; Mephidrone drugs of 1 kg 75 grams have been seized.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १ ऑक्टोबर.

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर  अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत.पुण्यातील  ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले. या मेफिड्रोनची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. रुग्णालयासमोर हे अमली पदार्थ जप्त केल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ विक्रीचं हे हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे.रुग्णालयात भरती असतानासुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे?

ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याच्यावर ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असतानासुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे ? याचा तपास पोलिस करत आहेत. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का ? या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे.

शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचं दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज पुरवण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी धडाधड कारवाया देखील सुरु केल्या आहेत. त्यातच पुणे परिसरातून तब्बल ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या ५ जणांना अटक करण्यात आली होती. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये पाच जण मेथाक्युलोनसह पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून एक वाहन जप्त केलं होतं. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले ४ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले होते. यामध्ये मेथाक्युलोन हा पदार्थ आढळला असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी  लागलीच पाच जणांना अटक केली होती. आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचंदेखील समोर आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!