निधनवार्तामावळ

दुचाकीला कंटेनरची धडक, झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार.

अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह पलायन केले.

Spread the love

दुचाकीला कंटेनरची धडक, झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ ऑक्टोबर.

दुचाकीला कंटेनरची पाठीमागून जोरात धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील नाणोली फाट्याजवळ शनिवारी (दि. ३०) सायंकाळी चारच्या सुमारास झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह पलायन केले.

सुनील बाळू वाघमारे (वय २५), आर्या सुनील वाघमारे (वय ४, दोघेही रा. राजपुरी, ता. मावळ, जि. पुणे) हे,
बाप लेक गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. अपघाताचे वृत्त समजतात घटनास्थळी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली.दोघांनाही उपचारासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून ते किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दिली.

सुनील वाघमारे हे दुचाकी चालवत होते. नातेवाइकांना भेटल्यानंतर खेड येथून टाकवे बुद्रुक गावाकडे येत असता नाणोली फाट्याजवळ हा अपघात झाला. कंटेनर अंगावरून गेल्याने सुनील वाघमारे आणि आर्या वाघमारे हे जागीच ठार झाले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!