आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बाबामहाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात कीर्तन , प्रवचन , गाथा पारायणाला शेकडो वारकरी भाविक..

Spread the love

बाबामहाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात कीर्तन , प्रवचन , गाथा पारायणाला शेकडो वारकरी भाविक..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी ३० डिसेंबर.

बाबामहाराज सातारकर यांचे मंञ मंदिरात कीर्तन , प्रवचन , गाथा पारायणाला शेकडो वारकरी भाविक बसत आहे.
या वर्षी ता.२६ डिसेंबर २०२२ ते ता.२ जानेवारी २०२३ अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. यावर्षी मंडप न टाकता साधेपणाने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हा सप्ताह होतआहे.

रोज सकाळी आठ ते एक असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची गाथा याचे पारायणासाठी महिला व पुरूष , तरूण वारकरी यांची मंदिरात गर्दी होत आहे.
दुपारी दोन ते चार गाथेवरील भजन , सायंकाळी हरिपाठ , प्रवचन साडेचार ते साडेपाच , सहा ते आठ दरम्यान ह.भ.प.बाबामहाराज सातारकर , ह.भ.प.भगवती महाराज सातारकर (दांडेकर ) आणि ह.भ.प.युवा कीर्तनकार चिन्मय महाराज सातारकर यांची कीर्तनसेवा होत आहे.

ता.२ रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचेकडून काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रमानंतर सप्ताहाची सांगता होईल…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!