आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करताना एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश..

लोणावळ्यात सुदर्शन हॉटेल येथील वेश्या व्यवसायाचा सत्यसाई कार्तिक यांनी केला पर्दाफाश...

Spread the love

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करताना एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ३० डिसेंबर :

शहरातील मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या हॉटेल सुदर्शन येथे लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी  सत्यसाई कार्तिक यानी धडक कारवाई करत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.

सहाय्यक पोलीस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक हे अवैध व्यवसायाच्या विरोधात आक्रमक झाले असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहिम सुरु केली आहे. अवैध दारुधंद्यावर कारवाई, मटक्याच्या व्यावसायावर कारवाई तसेच आज लोणावळ्यातील सुदर्शन हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यावसायावर धडक कारवाई करत वेश्या व्यावसायाचा पर्दाफाश केला आहे.जी

लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत सुदर्शन हॉटेलमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तीक यांना मिळाल्यानंतर आज सायंकाळी  याठिकाणी लोणावळा उप विभागातील पोलिसांच्या पथकाने छापा मारत सदरची कारवाई केली. हॉटेल मालक सतिष एच शेट्टी (वय 59, रा. सुदर्शन हॉटेल, मुंबई पुणे रोड लोणावळा) व त्याची महिला साथीदार यांच्यावर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं.244/2022 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 भा.द.वि. कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे… तर पिडित दोन महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. लोणावळा उप विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती गोफणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता सुदर्शन लॉज व्यवसायाकरीता महिला बोलावून घेवून त्यांच्या कडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, आण्णा बनसोडे, महिला पोलीस हवालदार मसळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, चालक दत्ता शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली असून या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल हे करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!