ताज्या घडामोडी
बॅंको ब्ल्यू रिबन वर्गवारीत दत्त नागरी पतसंस्था इस्लामपूर प्रथम क्रमांक.
शिराळा प्रतिनिधी / सहकार श्रेत्रातील अत्यंत मानाचा बॅंको ब्ल्यू रिबन २०२१ हा ७० ते ९० कोटी च्या ठेव असलेल्या वर्गवारीत श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर पहीला क्रमांक मिळाला._
आज या पुरस्काराचे वितरण बॅंको संस्थेचे संस्थापक अविनाश शिंत्रे यांचे हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे चेअरमन प्रा. श्रीकांत चव्हाण यांनी स्विकारला. यावेळी व्हा. चेअरमन बी. टी. निकम, प्रधान शाखेचे शाखा प्रमुख दिनेश हसबनीस व कार्यलक्षी संचालक संजय हिरवे उपस्थित होते_