ताज्या घडामोडी

बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा: संतोष राऊत

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले.ते बिळाशी ता शिराळा येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वराज अभियानांतर्गत महीला मेळाव्यात बोलत होते. यावेळी माजी उपसभापती आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, महीलांनी व बचत गटांनी छोटे छोटे व्यवसाय उद्योगधंदे सुरू करुन आपली आर्थिक प्रगती साधावी.यासाठी शासन, बॅंके विविध योजना राबवित आहे.याची माहिती आपण घेतली पाहिजे.यावेळी प्रकल्प सन्मवयक एस.टी.कुंभार, बिळाशी बॅंकेचे शाखाधिकारी एस.बी.चव्हान, निनाईचे संचालक बाजीराव पाटील, सरपंच कल्पनाताई यमगर,उपसरपंच सुवर्णा साळुंखे, ग्रामसेवक योगेश नाईक ग्रामपंचायत सदस्यविजय रोकडे, विनायक पाटील, चंद्रकांत साळुंखे, दत्तात्रय मगदुम, सुवर्णा पाटील, सुजाता देशमाने, सरिता पाटील, ईंदुताई यमगर , विजय साळुंखे,दत्तात्रय शिपेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!