ताज्या घडामोडी

विश्वासराव नाईक साखर कारखाना येथे ध्वजारोहणाचा समारंभ उत्साहात

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज ता. १५ ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालयाच्या विद्याथ्यांनी राष्ट्रगीत गायले. सुरक्षा अधिकारी जयकर गायकवाड व सुरक्षा रक्षक दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी उपाध्यक्ष, माजी आमदार पाटील यांनी व प्रज्ञा पाटील या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कारखाण्याचे संचालक सर्वश्री दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, सुरेश पाटील, यशवंत निकम, संभाजी पाटील, संदीप तडाखे, बाबासो पाटील, बिरुदेव आमरे, यशवंत दळवी, कोंडीबा चौगुले, तुकाराम पाटील, अजितकुमार पाटील, आनंदराव पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, कामगार संघटना पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!