ताज्या घडामोडी

प्रा. अरूण घोडके यांना मुंबई येथील फौंडेशनच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न पुरस्कार प्रदान

Spread the love

मुंबई (अंधेरी) येथील ‘शून्य से शिखर’ फौंडेशन च्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेतेचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न सन्मान पुरस्कार” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा.भीमराव आंबेडकर यांचे शुभहस्ते मुंबई (अंधेरी) येथील महापौर भवन मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. भारतीय डाकविभागाचे संचालक श्री. मनोहर पत्की यांनी प्रा. अरूण घोडके यांना त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटांची मुळप्रत यावेळी सन्मानपूर्वक देण्यात आली. तसेच देशभरातील विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी केल्याबद्दल अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी फौंडेशनच्या सी. ई.ओ. मा.डॉ. चंद्रकला सिंह, डॉ. सुधीर तारे, जेलर मा.संघमित्रा शेळके, सुनील जोधा, डॉ.प्रवीण निखारे, डॉ. गहरवाल, डॉ. राजकुमार खुराणा आणि फौंडेशनचे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!