ताज्या घडामोडी

मांगले येथे जोतिर्लिंग दुध संस्थेच्या वतीने नवीन गाय म्हैस खरेदी साठी बिनव्याजी कर्ज योजना

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / मांगले (ता.शिराळा)भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री जोतिर्लिंग दुध उत्पादक संस्था मांगले यांच्या वतीने दुध उत्पादक शेतकरयांना चेअरमन मा महेश पाटील (दादा) यांच्या हस्ते जेलेबी वाटप करण्यात आले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या
संस्थेमार्फत दुध उत्पादक शेतकरयांना नवीन गाय / म्हैस खरेदी साठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू करणार असल्याचे तसेच जातिवंत जनावरे पैदास कार्यक्रम अंतर्गत सवलतीच्या दरात एब्रीओ(IVF) ट्रान्स्फर उपलब्ध केले जाणार आहेत त्यामुळे प्रतिदिन ६० लिटर दूध देणाची क्षमता असणारी गाय शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होईल यांचा लाभ दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे मा महेश पाटील म्हणाले,यावेळी सचिव कृष्णात काटकर संचालक नागेश चरापले मनोज शेवडे संदिप चरापले राजेंद्र शिंदे सागर शिंदे किशोर पाटील रितेश शेटे सौरभ साखरे पिंटू कुंभार उत्पादन कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!