महाराष्ट्रमावळराजकीय

देशाला स्थिरता व मजबुती देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले:सचिन सावंत.

Spread the love

देशाला स्थिरता व मजबुती देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले:सचिन सावंत.Congress party did the job of giving stability and strength to the country: Sachin Sawant.

आवाज न्यूज : मावळ वार्ताहर, १० नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे:काँग्रेस पक्षाला तत्व आणि विकासाची दिशा आहे.स्वातंत्र्य काळानंतर देशाला स्थिरता व मजबुती देण्याचे काम काँग्रेस पक्षानेच केले आहे.ज्या देशात अज्ञानाचा अंध:कार होता त्या देशात विज्ञानाचा दिवा लावायचा काम काँग्रेसने केले.मोदी सरकार हे जातीयवादी सरकार आहे.शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, जातियवाद , भ्रष्टाचार, आरक्षण, यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.

या शासनाला खाली खेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कंबर कसली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.तळेगाव दाभाडे येथे आयोजित मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, ज्येष्ठ नेते रामदास काकडे, तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, महिला अध्यक्षा प्रतिभा हिरे,शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम, ॲड. दिलीप ढमाले, प्रवक्ते मिलिंद अच्युत, ॲड. खंडूजी तिकोणे, माऊली काळोखे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, बाळासाहेब ढोरे,गणेश काजळे, रणजीत काकडे, विशाल  वाळुंज, हाजीमलंग मारीमुत्तू,योगेश पारगे, ॲड. निवृत्ती फलके, राजीव फलके , राजू शिंदे, समीर दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले, नागरिकांच्या मी सतत संपर्कात असतो. जनतेची नाळ माझ्याबरोबर असल्यामुळे मी सहज आमदार झालो.भारतीय जनता पक्ष मराठा आंदोलन, धनगर आंदोलन अशा पद्धतीने फूट पाडायचं काम करत आहे. यांच्या नादी लागू नका. काँगेसच्या नेत्यांनी देशासाठी त्यागाची भूमिका घेतली. त्यामुळेच आपल्या देशाची नोंद वैभवशाली इतिहासात झाली. मावळात फिरताना भीती वाटते. सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झाले आहे.

रामदास काकडे म्हणाले,मावळ तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे.पक्षातील कार्यकर्त्यांना उर्जा आणि पाठबळ देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे.यशवंत मोहोळ ,यादवेंद्र खळदे, कैलास कदम, दिलीप ढमाले, मिलिंद अच्युत,माऊली काळोखे आदींनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन रोहिदास वाळुंज यांनी केले. राजेश वाघोले यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!