कृषीवार्तामावळसामाजिक

मावळातील पिंपळोली येथे आढळला इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर.

Spread the love

मावळातील पिंपळोली येथे आढळला इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर.An Indian rock python was found at Pimpoli in Maval.

आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी ९ नोव्हेंबर.

पिंपळोली गावातील शेतकरी पांडुरंग बोंबले यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ झुडपात इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर आढळून आला.पांडुरंग बोंबले हे गुरे चारण्यासाठी रानात गेले असता. त्यांच्या गुरांच्या गोठ्या शेजारील झुडपात हा अजगर आढळला, त्यानी ताबडतोब वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद काली केदारी, अविनाश केदारी यांना फोन केला. त्यांनी ताबडतोब जागेवर जाऊन पहाणी केले असता इंडीयन रॉक पायथन जातीचा अजगर होता.

त्यांनी वन्यजीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्याशी संपर्क साधला सविस्तर माहिती घेतल्यानंतर साप हा मानव वस्ती जवळ असल्यामुळे वडगांव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या सूचनेनुसार वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अजगरास रेस्कु करून त्याची प्राथमिक तपासणी करून अध्यक्ष अनिल आंद्रे तसेच सदस्य काली केदारी, दक्ष काटकर,अविनाश केदारी, संतोष दहिभाते,लोकेश धुमाळ, सागर सोळंकी यांनी मिळून वन विभागाने सांगितलेल्या जागेमध्ये जाऊन सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!