आरोग्य व शिक्षणमावळ

‘प्रतिभा महाविद्यालयाची वृक्षवल्ली वाढत राहो’ – मा. आ. कृष्णराव भेगडे.

सोमाटणेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या नवीन शैक्षणिक शाखेचे उद्घाटन. मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देणे, हाच उदात्त हेतू - डॉ. दीपक शहा...

Spread the love

‘प्रतिभा महाविद्यालयाची वृक्षवल्ली वाढत राहो’ – मा. आ. कृष्णराव भेगडे..’May the tree of Pratibha College continue to grow’ – Hon. come Krishnarao Bhegade..

सोमाटणेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या नवीन शैक्षणिक शाखेचे उद्घाटन.मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देणे, हाच उदात्त हेतू – डॉ. दीपक शहा…

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड प्रतिनिधी ९ नोव्हेंबर.

मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे कमला शैक्षणिक संस्थेचे प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेजच्या नवीन शाळेच्या कार्यालयाचे उद्घाटन मावळ भूषण तथा माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, सोमाटणे गावचे सरपंच स्वाती कांबळे, उपसंरपंच नितीन मुऱ्हे, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक डॉ. दीपक शहा, डॉ. भूपाली शहा, डॉ. तेजस शहा, डॉ. स्वप्नील शहा, विश्वस्त सिद्धांत शहा, निखील मेहता, विशाल मुऱ्हे, गौरव शहा, अंबरचे संपादक सुरेश साखवळकर समवेत विविध क्षेत्रातील आणि सोमाटणे गावचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उ‌द्घाटक माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले, ” कमला शिक्षण संस्थेच्या भरभराटीत माझ्या कारकिर्दीमध्ये मी खारीचा वाटा उचलला आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी संस्था म्हणून आज अल्पावधीतच नावारूपाला आली आहे. आज तिचे वृक्षात रूपांतर झाले. त्याचा वटवृक्ष व्हावा. वृक्षवली वाढत राहो, अशा शुभेच्छा देत ते पुढे म्हणाले, वडगांव ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. देहूरोड ते लोणावळा परीसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोमाटणे गावची लोकसंख्या आज पंचवीस हजारावर गेली आहे. अनेक इमारतीचे बांधकाम होत आहे. येथील ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी बैठकीत ठराव संमत करून नगरपंचायत निर्माण करण्याची मागणी करावी. आज आजी-माजी आमदार देखील उपस्थित आहेत, अशा सुचना करून सोमाटणे व आजूबाजूच्या भागाचा भविष्याचा विचार करून विकास आराखडा तयार करावा, असे आवाहन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले.

आमदार सुनिल शेळके म्हणाले “राजकारणाच्या पलीकडे जावून उद्याच्या पिढीला घडविले पाहीजे. मावळ तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहीजे. माजी आमदार कृष्णराव  भेगडे यांनी शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव कामे केली आहेत. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात वडगांव, तळेगांव भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वेळोवेळी त्यांनी होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य व मदत केली, हे कौतूकास्पदच आहे. शेवटी संस्था टिकली व वाढली पाहीजे, असे मत आ. शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.

माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे म्हणाले ” येणाऱ्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे, ही काळाची गरज आहे. सोमाटणे गाव शहर म्हणून नावारूपाला येत आहे. या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु होत आहेत. नागरिकांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. पालकांचा कल देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत नाव नोंदणी करण्याकडे दिसून येत आहे. जे जे सहकार्य लागेल ते दिले जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

सोमाटणेचे उपसरपंच नितीन मुऱ्हे म्हणाले, ”सर्व दृष्टीने सोयीचे सोमाटणे गाव आहे. येथील रहिवासी मध्यमवर्गीय आहे. या गावात नवीन शाळेमुळे गावाचे वैभव वाढणार आहे. गावाच्या संस्कृतीचे जतन करून येथील मुलांना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावे”, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कमला शैक्षणिक संथेचे संस्थापक डॉ. दीपक शहा म्हणाले, “सोमाटणे येथे शैक्षणिक शाखा सुरु करण्यामध्ये येथील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देणे, हाच उदात्त हेतू आहे. येत्या जूनपासून शाळा सुरु करण्यात येणार आहे. त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. तसेच भोसरी येथे प्रतिभा स्कील डेव्हलपमेंट सेंटरमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. तसेच बाणेर येथे सवलतीच्या दरात डायग्नोसिस सेंटरमध्ये सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सामाजीक जाणिवेतून हे सर्व उपक्रम सुरु करण्यात येत असल्याचे आवर्जून शहा यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रकाश ओसवाल यांनी तर, आभार विश्वस्त सिद्धांत शहा यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!