क्रीडा व मनोरंजनसामाजिक

सरस्वती विद्या मंदिर मध्ये पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प.

फटाक्याच्या खर्चामध्ये कपात करून त्याचा उपयोग समाज उपयोगी कार्यासाठी करावा असे आवाहन. रेखा परदेशी मुख्याध्यापिका सरस्वती विद्या मंदिर.

Spread the love

सरस्वती विद्या मंदिर मध्ये पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प ; फटाक्याच्या खर्चामध्ये कपात करून त्याचा उपयोग समाज उपयोगी कार्यासाठी करावा असे आवाहन. रेखा परदेशी मुख्याध्यापिका सरस्वती विद्या मंदिर. 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ९ नोव्हेंबर.

सरस्वती विद्या मंदिर मध्ये पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प.राष्ट्रीय हरित सेना आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांना सध्या आपल्या बदलत्या हवामानाविषयी माहिती देण्यात आली.

त्याचप्रमाणे प्रदूषणामध्ये आपले शहर अग्रेसर असून आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे व पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी, हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आपण सर्वांनी दिवाळीचे फटाके मर्यादित प्रमाणात वाजवावे असे आवाहन करण्यात आले.

फटाक्याच्या खर्चामध्ये कपात करून त्याचा उपयोग समाज उपयोगी कार्यासाठी करावा असे आवाहन मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख  संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याअंतर्गत घेतली. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!