सामाजिक

ओवळे ग्रामपंचायतीची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल

ओवळे ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त गावातील महिलांचा सन्मान

Spread the love

ओवळे : आज जागतिक महिलादिनानिमित्त ओवळे गावातील  महिलांना पुष्पगुच्छ/साडी देऊन ओवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.लेक लाडकी ह्या योजनेसाठी ग्रामपंचायत ने सर्वेक्षण करून 6 महिलांची निवड केली.त्यातील उपस्थित 5 महिलांना आज महिलादिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.तसेच आम्ही आतापर्यंत गावाच्या विकासासाठी रस्ते ,पाणी ,वीज ,मंदिरविकास ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम केलेले आहे.

तसेच गावातील जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत.तसेच ग्रामपंचायत च्या माध्यमातून राज्यशासन व केंद्रशासनाच्या सर्व योजनांचा लाभ आपल्या गावातील जनतेला कसा मिळवुन देता येईल. तसेच सर्व योजनांच्या माध्यमातून गावचा विकास कसा करता येईल. ह्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी भविष्यात प्रयत्न करणार असून ओवळे ग्रामपंचायत ला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार कसा मिळेल हे स्वप्न आम्ही पाहिलेल आहे.आणि हे स्वप्न पुर्ण करण्यासाठीच आम्ही भविष्यात काम करणार आहोत. असे मनोगत ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,ग्रा.सदस्य, ग्रामसेवक यांनी व्यक्त केले.तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त-अजित शिंदे यांनी ओवळे ग्रामपंचायत व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी चांगल्याप्रकारे कार्य करत असुन तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी ओवळे ग्रामपंचायतीचा व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा आदर्श घेतला पाहिजे.तसेच असेच कार्य जर आपण येथुन पुढे देखील करत राहीलात तर लवकरच ओवळे ग्रामपंचायत ला महाराष्ट्र शासनाकडून आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही.असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी ओवळे ग्रामपंचायत चे सरपंच-श्री.दिलीपनाना शिंदे,उपसरपंच-सौ.भाग्यश्रीताई साठे,ग्रा.सदस्य-पै.तुषार साठे,पै.संतोष भालेराव, रामदास भाऊ वाटाणे,हिरामण भालेराव, पोर्णिमा कारेकर ,युवा उद्योजक-अविनाश साठे,(मावळ पं.स) विस्तार अधिकारी -मतकरसाहेब ग्रामसेवक-जगजीवन मोढोरिये,मा.सरपंच-अशोक साठे,सौ.सविता शिंदे,सौ.सुजाता साठे,सौ.सुनिता साठे,सौ.मंगल कराळे, सौ.सारिका शिंदे,सौ.पुजा शिंदे,सौ.आरती तावरे,सौ.शोभा शिंदे,युवा नेते-शिवभक्त अजित शिंदे अंगणवाडी मदतनीस,आशासेविका ,तसेच गावातील अनेक महिला,माता-भगिनी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!