आपला जिल्हासामाजिक

शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवरून विविध कार्यक्रमांचं आयोजन

शिवरायांना अभिवादन करण्यासाठी किल्ले शिवनेरीवर गर्दी... शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी विविध कार्यक्रमांचं आयोजन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हजेरी

Spread the love


जुन्नर-पुणे
: आज 19 फेब्रुवारी… अवघ्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला . तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न झाला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शासकीय शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर फक्त पास धारकांनाचं प्रवेश होता.

शिवजयंतीच्या निमित्ताने यावेळी शिवनेरीवरच्या पाळणाघरात महिलांनी पाळणागीत गायलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी शिवनेरीवर गर्दी केली होती. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन शिवनेरीवर करण्यात आलं असून यात लहान मुलांनी छत्रपतींचा जीवनपट मांडणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही मुलांनी साहसी खेळांची प्रात्याक्षिकेही सादर केली.

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या जन्मोत्सात सहभागी होता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले होते. यावेळी संभाव्य गर्दीचं नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण खरदारी घेण्यात आली होती. शिवनेरीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!