देश विदेश

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आग्रा किल्ल्यात होणार शिवजयंतीचा जल्लोष

आग्र्यात ३९४व्या जयंतीचा उत्साह!

Spread the love

आग्रा : गेल्या वर्षी पहिल्यांदाच आग्र्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाचं दुसरं वर्ष असून त्याची जोरदार तयारी आग्र्यात करण्यात येत आहे. ३९४व्या शिवजयंती उत्सवासाठी आग्रा नगरी सजली असून आज संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. रात्री साधारण १० वाजेपर्यंत या सोहळ्यात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिल्लीतल्या आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आम मध्ये आज संध्याकाळी शिवरायांची शौर्यगाथा गुंजणार.
आग्र्यातील या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!