आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्रमावळसामाजिक

लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी वर्ष (2023-24 ) आणि राष्ट्रीय परिषदेचे भारताच्या राष्ट्रपती सन्मानीय द्रोपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उद्घाटन.

योगाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, या विषयावर दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 रोजी तीन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी वर्ष (2023-24 ) आणि राष्ट्रीय परिषदेचे भारताच्या राष्ट्रपती सन्मानीय द्रोपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उद्घाटन..

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ३ डिसेंबर.

Conference on स्वामी कुवलयानंद यांनी 1924 साली कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती. 2023-24 साली संस्था आपले शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. याचे औचित्य साधून संस्थेत आयुष मंत्रालय, नवी दिल्ली आणि कुडीलाल गोविंदराम सेक्सेरिया फाउंडेशन यांच्या सहयोगानेIntegration of Yoga in School Education System- Manifesting the thought ” ( योगाचाशालेय अभ्यासक्रमात समावेश ) या विषयावर दिनांक 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 रोजी तीन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षाचे आणि राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर2023 रोजी दुपारी 3.30 वाजता भारताच्या राष्ट्रपती सन्मानीय द्रोपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय  रमेश बैस, महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री.अदिती तटकरे, कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय डॉ. ओमप्रकाश तिवारी, कैवल्यधाम शताब्दी वर्ष कमिटीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सन्मानीय  सुरेश प्रभू तसेच संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यातआले.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बैंड पथक यांनी राष्ट्रगीताने केली आणि कैवल्य निकेतन शाळा व
कैवल्यधाम योग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शांती मंत्राने केली.कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी
व्यासपीठावरील सन्मानीय व्यक्तींचा परिचय करून दिला तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपस्थित
मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी यांनी सन्मानीय राष्ट्रपती
श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचा शाल, गायत्री फ्रेम, कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा, मानचिन्ह देऊन सत्कार
केला. यानंतर कैवल्यधाम संस्थेचा 100 वर्षाचा प्रवास हा माहितीपट संक्षिप्त स्वरुपात दाखविण्यात
आला.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मानीय  रमेश बैस यांच्या हस्ते योग विषयावरील 1)Astangayoganirnaya, The essence of tejobindu upnishad Dr. Rajeshwar Mukherjee & Dr. Bandita Satapathy 2) Saptabhumikavicarah, A vedabtic scheme for integral personality- Dr. Kala Acharya 3) Holistic Health, Through Yoga and Naturopathy- Dr.Santosh Pandey या तीन पुस्तकांचे अनावरण करण्यात आले आणि सदर पुस्तकांच्या प्रथम प्रती
सन्मानीय राष्ट्रपतींस सप्रेम भेट स्वरुपात देण्यात आल्या.कैवल्यधाम शताब्दी वर्ष कमिटीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी भाषणकेले. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपती सन्मानीय द्रोपदी मुर्मू यांनी उपस्थितांना संबोधित केले.

उद्घाटन सोहळ्याची सांगता पोलीस बैंड पथक यांनी राष्ट्रीय गीत सादरीकरणाने केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  हर्षवर्धन झव्हेरी यांनी केले.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशाच्या विविध राज्यातील जवळपास 200 प्रतिनिधी, कैवल्यधाम गव्हर्निंग मंडळाचे सभासद, लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, कैवल्यधाम संस्थेतील अधिकारी वर्ग योग महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व विद्यार्थी, लोणावळ्यातील विविध शाळेतील शिक्षक वर्ग, तसेच पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या परिषदेत योगतज्ञांची व्याख्याने, Workshop (कार्यशाळा ) Plenary Session ( सत्र ), Panel
Discussion ( चर्चा), Poster Presentation चे आयोजन करण्यात आले होते. तसेच भक्ति योग मंत्र
उच्चारण भरत नाट्यम आणि कत्थक नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले होते.
राष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी दुपारी १२ वाजता केरळ
राज्याचे सन्मानीय राज्यपाल  आरिफ मोहम्मद खान यांच्या शुभ हस्ते पंजाब स्कुल एज्युकेशन बोर्ड
च्या अध्यक्षा आणि निवृत्त IAS डॉ. सतबीर बेदी, कैवल्यधाम संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश
तिवारी, संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी  सुबोध तिवारी तसेच संस्थेचे प्राध्यापक
डॉ. रणजीत सिंग भोगल यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात
राष्ट्रीय गीताने झाली.राज्याचे सन्मानीय राज्यपाल  आरिफ मोहम्मद खान आणि पंजाब स्कुल एज्युकेशन बोर्ड च्या
अध्यक्षा आणि निवृत्त IAS डॉ. सतबीर बेदी यांचा शाल, मानचिन्ह आणि शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन
कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी यांनी सत्कार केला.

प्राध्यापक रणजीत सिंग भोगल यांनी प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे
मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी  सुबोध तिवारी यांनी राज्यपाल महोदयांचा परिचय करून
दिला तसेच कैवल्यधाम शताब्दी वर्षात राबविल्या जाणा-या कार्यक्रमांची संक्षिप्त स्वरुपात माहिती
सांगितली. डॉ. सतबीर बेदी यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षा निमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
कैवल्यधाम संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी यांनी कैवल्यधाम संस्थचे संस्थापक स्वामी
कुवलयानंद यांनी दिलेला योगाचा संदेश आपल्या भाषणातून व्यक्त केला.

शेवटी केरळ राज्याचे सन्मानीय राज्यपाल  आरिफ मोहम्मद खान यांनी योगाचे महत्व आपल्या भाषणातून पटवून देवून
उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  हर्षवर्धन झव्हेरी यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
राष्ट्रीय परिषदेचे Organising Chairman सुबोध तिवारी, Organising Secretary डॉ. एन.डी.जोशी,
आणि Conference Convener श्रीमती अंजली देशमुख हे होते.कैवल्यधाम संस्थेचा शताब्दी वर्ष उद्घाटन व समारोप कार्यक्रम तसेच राष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या पार
पाडण्यासाठी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी,
सुसज्ज पोलीस सुरक्षा यंत्रणा तसेच लोणावळा नगरपरिषद यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!