आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

उद्या राज्यात 10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी होणार.

आरोग्य तपासणी करून घेण्याचे एस.एम देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन.

Spread the love

उद्या राज्यात १०,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी होणार ; आरोग्य तपासणी करून घेण्याचे एस.एम देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन.10,000 journalists will undergo health check-up in the state tomorrow; SM Deshmukh’s appeal to journalists to get health check-up.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २ डिसेंबर.

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या रविवारी राज्यातील बहुतेक जिल्हे आणि जवळपास सर्वच तालुक्यात “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन करण्यात आले आहे.. राज्यात उद्या १०,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा परिषदेचा संकल्प असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे.

मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली.. गेली दहा वर्षे परिषदेच्या वतीने ३ डिसेंबर हा दिवस राज्यात “पत्रकार आरोग्य तपासणी दिवस” म्हणून साजरा केला जातो. राज्यात ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत.. यातील बहुसंख्य जिल्हे आणि तालुक्यात उद्या आरोग्य तपासणी केली जात असून काही ठिकाणी ५,७ डिसेंबर रोजी पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

गत वर्षी राज्यात ७,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली होती. यावर्षी १०,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा परिषदेचा संकल्प आहे. परिषदेचा हा संकल्प यशस्वी झाला तर एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्व विक्रम होणार आहे.

पत्रकार नेहमीच समाजासाठी जगत असतो. अत्यंत धावपळीचे आणि दगदगीचे जीवन जगत असताना पत्रकारांचे नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हे वास्तव लक्षात घेऊन परिषदेच्यावतीने ३ डिसेंबर रोजी राज्यातील तालुका आणि जिल्हा स्तरावर आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या गावात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!