Puneक्राईम न्युज

जातिवाचक टोमणे दिल्याने पतीवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Spread the love

जातिवाचक टोमणे दिल्याने पतीवर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.A case has been registered against the husband in Sinhagad police station for making casteist taunts.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २ डिसेंबर.

आपल्या विवाहित पत्नीला जातीवाचक टोमणे देणाऱ्या पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर गोविंद कोतकर (वय 50) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून यासंदर्भात पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिनकर कोतकर विरुद्ध भा.द.वि 498(अ),323,504,506, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अन्वये, 3 (1) (ए), 3 (1) (आर),६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अनुसूचित जाती-जमातीमधून असून आरोपी हा मराठा समाजातील आहे.

सदर महिलेची २०१९ मध्ये कोतकर याच्याशी भेट झाली. काही काळानंतर त्यांची मैत्री झाली व त्यापुढे आरोपीने महिलेला लग्नाची मागणी केली. मात्र मी अनुसूचित जातीची आहे असे सांगितले असता आरोपीने तिला मी जात-पात मानत नाही असे सांगत तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी आळंदी याठिकाणी नेऊन लग्न केले. लग्नाच्या काही वर्षांनंतर आरोपीचे त्याच्या जुनी मैत्रीण असलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे पिडीतेला समजले. त्याबाबत विचारणा केली असता आरोपीने महिलेला जातीवरून टोमणे मारण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे स्वयंपाकावरून भांडण करत बेदम मारहाणही केली.

यामध्ये महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली. आपला संसार टिकवण्याच्या हेतूने महिलेने त्यावेळी संबंधित प्रकार कोणाला सांगितला नाही. पीडित महिलेला आरोपीने ‘तुझ्यामुळे माझ्या मुलाचं लग्न होत नाही तू खालच्या जातीची आहे’ असे सांगत अनेकदा मानसिक त्रासही दिलेला आहे. या सर्व घटनेबाबत महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात दिनकर कोतकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!