अध्यात्मिकदेश विदेश

आयोध्येत श्रीराम लल्लाचे प्रतिष्ठापना निमित्ताने थेट प्रक्षेपण व आरती, प्रसादाचे वाटप.

Spread the love

आयोध्येत श्रीराम लल्लाचे प्रतिष्ठापना निमित्ताने थेट प्रक्षेपण व आरती, प्रसादाचे वाटप.Live broadcast and Aarti, distribution of Prasad on the occasion of installation of Shri Ram Lalla in Ayodhya.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २२ जानेवारी.

आयोध्येत श्रीराम लल्लाचे प्रतिष्ठापना निमित्ताने थेट प्रक्षेपण व आरती, प्रसादाचे वाटप असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. श्रीराम भगवान की जय ! ! जय श्रीराम ! ! असा जयघोष यावेळी भाविकांकडून करण्यात आला.

दुपारी १२ वाजून सात मिनिटांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हॕलिकॕप्टर मधून अयोध्येतील भव्यदिव्य राममंदिरात एका, एका दालनात व अखेर गर्भगृहात आगमन झाल्यानंतर शंखनाद, विधिवत पूजा यथासांग पार पडून श्रीरामलल्लाचे बाल्यावस्था रूपामधे सर्वांना दर्शन झाले आणि एकच जयघोष झाला. यावेळी मंश्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना श्री मोदीजी यांचे हस्ते तसेच आरएसएसचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांचे उपस्थितीमधे कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास येथील आरएसएसचे पदाधिकारी यांनी मोठीस्क्रीन व मंदिर देवस्थानतर्फे मंडप प्रसाद, फळांचा, खिचडी, शिरा असा प्रसाद वाटप केला. सुमारे पाचशे ते आठशे महिला, पुरूष भाविकांकडून दर्शनाचा व प्रसादाचा व कार्यक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी व माजी उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी यांनी एकावन्न हजाराची देणगी मंदिराचे कळशारोहनासाठी दान केली.
यावेळी धनंजय चंद्राञे, आशिश बुटाला, माजी नगरसेवक दत्ताञेय येवले, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!